Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

Dashank Yoga June 2026 Prediction: 'दशांक योग' आता लवकरच मंगल आणि वरुण ग्रहांच्या विशेष संयोगामुळे आकाराला येणार आहे. 1 जून 2026 रोजी मंगळ आणि वरुण हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 36 अंशांवर स्थित असतील.
Dashank Yoga June 2026 Prediction
Dashank Yog 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

Dashank Yoga June 2026 Prediction: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची ठराविक अंशावर होणारी स्थिती मानवी जीवनावर परिणाम करत असते. असाच एक शुभ योग म्हणजेच 'दशांक योग' आता लवकरच मंगल आणि वरुण ग्रहांच्या विशेष संयोगामुळे आकाराला येणार आहे. 1 जून 2026 रोजी मंगळ आणि वरुण हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून 36 अंशांवर स्थित असतील, ज्यामुळे हा प्रभावी दशांक योग निर्माण होणार आहे.

या दिवशी दुपारी 3 वाजून 28 मिनिटांपासून हा योग सक्रिय होईल आणि विविध राशींच्या जातकांवर आपला शुभ प्रभाव टाकण्यास सुरुवात करेल. जून 2026 च्या सुरुवातीला या योगामुळे मेष, वृषभ, तूळ, कुंभ आणि मीन या पाच राशींच्या आयुष्यात आनंदाचे वारे वाहणार असून प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत.

मेष राशीच्या जातकांसाठी दशांक योग सर्वाधिक सकारात्मक ठरणार आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच तुमची आर्थिक बाजू बळकट होईल आणि बऱ्याच काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रेमसंबंधांमधील तणाव आणि समस्या या काळात कमी होताना दिसतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगल-वरुण युती नवीन संधी घेऊन येईल. विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थिरता देणारा असेल, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मन प्रसन्न राहील. तरुण वर्गासाठी हा काळ यशाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरेल.

Dashank Yoga June 2026 Prediction
Horoscope 30 April 2026: अक्षय्य तृतीयेचा सुवर्णयोग! 'या' राशींंचं पालटणार नशीब, गुंतवणुकीतून मिळणार चांगला परतावा; मेहनतीला यशाची सुवर्ण जोड

तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याचा असेल. दीर्घकाळापासून रेंगाळलेले तुमचे प्रोजेक्ट्स जून महिन्यात एकामागून एक पूर्ण होतील. वैवाहिक आयुष्यात पूर्वीपेक्षा अधिक सुख आणि स्थिरता येईल, तसेच कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे नाते अधिक दृढ होईल. कुंभ राशीच्या नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ मोठी कमाई करण्याची संधी घेऊन येणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील आणि वैवाहिक जीवनातील मोठ्या समस्यांचे निराकरण होऊन नात्यात गोडवा येईल.

Dashank Yoga June 2026 Prediction
Horoscope 29 April 2026: बुध-चंद्राची युती ठरणार लकी! 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना, तर काहींना खर्चाचा फटका

मीन राशीच्या जातकांसाठी दशांक योग स्थैर्य घेऊन येईल. नोकरीमध्ये पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची जून 2026 मध्ये प्रबळ शक्यता आहे. विशेष म्हणजे, जे लोक अविवाहित आहेत, त्यांचे लग्नाचे (Marriage) नाते एखाद्या बालपणीच्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी जुळण्याचे योग आहेत. एकूणच, मंगल आणि वरुण ग्रहांचा हा दुर्मिळ योग या पाच राशींच्या जीवनात सुधारणा आणि आनंदाचे पर्व घेऊन येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com