Hugh Morris Death Dainik Gomantak
देश

क्रिकेट विश्वावर शोककळा! अ‍ॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Hugh Morris Death: इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि अनुभवी प्रशासक ह्यूज मॉरिस यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

Sameer Amunekar

सध्या सुरू असलेल्या प्रतिष्ठित अ‍ॅशेस मालिकेच्या (Ashes Series) उत्साहावर विरजण पडले आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि अनुभवी प्रशासक ह्यूज मॉरिस यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते 'बोवेल कॅन्सर' (Bowel Cancer) सारख्या गंभीर आजाराशी लढा देत होते. २०२१ मध्ये त्यांना या आजाराचे निदान झाले होते, परंतु हळूहळू हा आजार त्यांच्या संपूर्ण शरीरात पसरला. त्यांच्या निधनामुळे केवळ इंग्लंडमध्येच नव्हे, तर संपूर्ण जागतिक क्रिकेट वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

ह्यूज मॉरिस यांनी १९९१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी इंग्लंडसाठी ३ कसोटी सामने खेळले. जरी त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अल्प राहिली असली, तरी प्रशासक म्हणून त्यांनी इंग्लंड क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

निवृत्तीनंतर त्यांनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळली. त्यांच्याच कार्यकाळात इंग्लंडने तीन वेळा एशेज मालिकेवर आपले नाव कोरले आणि २०१० मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉरिस यांना मोठी खेळी साकारता आली नसली, तरी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First-class Cricket) त्यांचा दबदबा होता. त्यांनी ५४४ डावांमध्ये तब्बल १९,७८५ धावा फटकावल्या आहेत. यामध्ये ५३ शतके आणि ९८ अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच 'लिस्ट-ए' क्रिकेटमध्येही त्यांनी ८,६०६ धावा केल्या आहेत. त्यांच्या या अष्टपैलू योगदानासाठी आणि समाजसेवेसाठी २०२२ मध्ये त्यांना प्रतिष्ठित 'एमबीई' (MBE) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या... वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 ज्येष्ठांचा होरपळून दुर्देवी मृत्यू; रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु Watch Video

Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

SCROLL FOR NEXT