Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

मोदीजी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की..: अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रावर बोचरी टीका केली.

दैनिक गोमन्तक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग केंद्र सरकारपुढे झुकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रावर बोचरी टीका केली.

पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, राज्य निवडणूक आयोग (Election Commission) 9 मार्च रोजी महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार होते, मात्र केंद्राने निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवले की त्यांना दिल्लीतील (Delhi) तीन महानगरपालिका एकत्र करायच्या आहेत. यानंतर निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा केली, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, लोक विचारत आहेत की तीन महानगरपालिका एकत्र करण्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याची काय गरज आहे? ते पुढे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना हात जोडून विनंती करतो की निवडणूक रद्द करू नका. देशात सत्तांतर होत राहील. आज आपण आहोत, उद्या कुणी दुसरे असेल. मात्र हा देश बदलणार नाही. आपण सर्वजण एकत्र येऊन देशासाठी काम करूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT