गोवा विधानसभा निवडणुकीचे (Goa Assembly Election) निकाल लागले असून भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या आहेत. मात्र पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. गोव्यातील बहुमताचा आकडा 21 आहे. आणि भाजपने गोव्यात 20 जागा आपल्या नावे केल्या आहेत.
निकाल जाहीर झाल्यानंतर गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केलेल्या दाव्यानुसार भाजपला गोव्यात तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे, त्यामुळे भाजपच्या एकूण जागांनी बहुमताचा टप्पा पार केला आहे.
MGP च्या समर्थनाला विरोध
मात्र, भाजप सरकार स्थापनेच्या दाव्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येत आहेत. गोव्यात भाजपचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा (MGP) पाठिंबा घेतल्याबद्दल पक्षात आपला निषेध नोंदवला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत एमजीपी पक्षाचे दोन आमदार विजयी झाले आहेत. सुदिन ढवळीकर आणि जीत आरोलकर अशी विजयी आमदारांची नावे आहेत. गोवा निवडणुकीत एमजीपीची तृणमूल काँग्रेससोबत युती होती. गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एमजीपीने भाजपला पाठिंबा देण्याचे पत्र सादर केले आहे.
गोव्याच्या निकलाचा परिणाम
भाजपला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेसला 11, आम आदमी पक्षाला 2, गोवा फॉरवर्ड पार्टीला 1, महाराष्ट्रवादी गोमंतक 2, RG पक्षाला 1 आणि अपक्ष उमेदवारांना 3 जागा मिळाल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा असून बहुमताचा आकडा २१ आहे. भाजपला अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा मिळाल्यास राज्यात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.