Delhi CM Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Excise Policy Case: अरविंद केजरीवाल यांची ईडीच्या समन्सविरोधात उच्च न्यायालयात धाव; याचिका केली दाखल

Delhi CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Manish Jadhav

Delhi CM Arvind Kejriwal:

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी सीएम केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाने पाठवलेल्या सर्व समन्सला न्यायालयात आव्हान दिले आहे. केजरीवाल यांनी आता ईडीने मद्य घोटाळ्यात पाठवलेल्या सर्व समन्सना न्यायालयात आव्हान दिले आहे. अबकारी धोरण घोटाळ्यात ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत 9 समन्स पाठवले आहेत. आता या सर्व समन्सला मुख्यमंत्री केजरीवाल यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.

दरम्यान, केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायालयाचे खंडपीठ बुधवारी सुनावणी करणार आहे. याआधी रविवारी केंद्रीय तपास यंत्रणेने केजरीवाल यांना नववे समन्स पाठवले होते आणि गुरुवारी म्हणजेच 21 मार्च रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. केजरीवाल ईडीच्या यापूर्वीच्या समन्सवर हजर न राहिल्याने त्यांना दिल्ली न्यायालयातून जामीन मिळाला आहे.

समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीने न्यायदंडाधिकारी न्यायालयात जाऊन केजरीवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अंमलबजावणी संचालनालयाला मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करायची आहे. आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या सर्व समन्सना बेकायदेशीर ठरवून केजरीवाल यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे, ईडीने 2 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पहिले समन्स पाठवले होते. यानंतर अरविंद केजरीवाल यांना 21 नोव्हेंबर, 3 जानेवारी, 18 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी आणि 4 मार्च रोजी समन्स बजावण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ईडी केजरीवाल यांना कोणत्याही स्थितीत अटक करु इच्छिते, असे अनेक आप नेत्यांनी म्हटले आहे.

तपास यंत्रणा केजरीवाल यांना कटाचा एक भाग म्हणून अटक करु इच्छित असल्याचा आरोप आप नेत्यांनी केला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia), माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन दारु घोटाळ्यात आधीच तुरुंगात आहेत. त्यांच्याशिवाय तपास यंत्रणेने आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनाही अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT