Delhi CM Arvind Kejriwal
Delhi CM Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Delhi CM Arvind Kejriwal: पाच समन्स बजावूनही केजरीवाल हजर झाले नाहीत; ईडीची कोर्टात धाव

Manish Jadhav

Delhi CM Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधातील दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या समन्सचे पालन न केल्याबद्दल दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी 7 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. ईडीने म्हटले आहे की, पीएमएलएच्या कलम 50 अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने जारी केलेल्या समन्सचे पालन केले गेले नाही.

दरम्यान, लोकसेवकाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल आयपीसीच्या कलम 174 अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. ईडीने दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, कलम 50 अंतर्गत चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर एखाद्या व्यक्तीची उपस्थिती आवश्यक आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात एकामागून एक 5 समन्स जारी केले आहेत. मात्र केजरीवाल ईडीसमोर हजर होत नाहीत. हे सर्व समन्स बेकायदेशीर असल्याचे सांगत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला.

मुख्यमंत्र्यांनी हे समन्स राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे

त्याचवेळी, आम आदमी पक्षाने ईडी समन्सबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले होते की, मोदीजींचा उद्देश केजरीवाल यांना अटक करणे आहे आणि असे करुन ते दिल्ली सरकार पाडू इच्छित आहेत. मात्र, आम्ही हे नक्कीच होऊ देणार नाही. अरविंद केजरीवाल यांनीही X वर या आरोपाचा पुनरुच्चार केला होता आणि चंदीगड महापौर निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचे सांगितले होते. आता याविरोधात शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना दिल्लीत ठिकठिकाणी रोखले जात आहे.

केजरीवाल यांना समन्स कधी बजावण्यात आले?

गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर आणि 21 डिसेंबर आणि यावर्षी 3 जानेवारी, 18 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीला केजरीवाल यांना समन्स पाठवण्यात आले होते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना समन्स का पाठवले जात आहे, असा सवाल उपस्थित केला. ते म्हणाले की, 'दोन वर्षांपासून तपास सुरु आहे, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच का बोलावले जात आहे? सीबीआयने 8 महिन्यांपूर्वी फोन केला होता. मी त्यावेळी उत्तरे दिली होती. आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच मला बोलावले जात असल्याने माझी चौकशी करणे हा त्यांचा उद्देश नाही. ते लोक मला फोन करुन अटक करु इच्छितात. जेणेकरुन मी प्रचार करु शकणार नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DGP Jaspal Singh : डीजीपींची खुर्ची अस्थिर, बिश्णोईंकडे देणार ताबा

Goa Weather Update : राज्यात पाऊस @ ३५ इंच; सरासरीच्या तुलनेत ४ टक्के अधिक

Ravindra Bhavan : स्वहितासाठीच नृत्य, संगीत वर्गांना विरोध : मोरेनो रिबेलो

Kala Academy : ‘कला अकादमी’साठी रस्त्यावर; मंगळवारपासून आंदोलन

Margao News : भररस्‍त्‍यावर कोसळला वृक्ष; सुदैवानेच प्राणहानी टळली! तब्‍बल चार तास वाहतूक ठप्‍प

SCROLL FOR NEXT