Army Officer Assaults Video Dainik Gomantak
देश

Video: लष्करी अधिकाऱ्याची दादागिरी! श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा मोडला

Srinagar Airport Incident: एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेट एअरलाईनच्या चार कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Manish Jadhav

Army Officer Assaults Video: श्रीनगर विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये बसण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेट एअरलाईनच्या चार कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत एका कर्मचाऱ्याचा कण मोडला. ही घटना 26 जुलै रोजी घडली असून तिचा व्हिडिओ (Video) आता समोर आल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

नेमकं काय घडलं?

  • अतिरिक्त सामानावरुन वाद: लष्करी अधिकारी त्याच्यासोबत दोन केबिन बॅगेज (Cabin Baggage) घेऊन आला होता, ज्यांचे वजन 16 किलो होते. नियमानुसार, केवळ 7 किलो सामान आणण्याची परवानगी असते. जेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याला अतिरिक्त सामानाबद्दल सांगितले आणि त्यासाठी पैसे भरण्यास सांगितले, तेव्हा त्याने पैसे देण्यास नकार दिला.

  • मारहाण: यावरुन दोघांमध्ये वाद वाढला आणि अधिकारी आक्रमक झाला. त्याने थेट कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. व्हिडिओमध्ये तो कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारताना आणि स्टँडने हल्ला करताना दिसत आहे.

  • कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत: या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा कणा मोडला आणि त्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. जेव्हा दुसरा कर्मचारी मदतीसाठी पुढे आला, तेव्हा त्याच्याही जबड्यावर लाथ मारण्यात आली, ज्यामुळे त्याच्या नाक आणि तोंडातून रक्त येऊ लागले.

स्पाइसजेटने दिलेल्या निवेदनानुसार, हा अधिकारी बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करताच जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये शिरला होता, जो सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. सीआयएसएफच्या अधिकाऱ्याने त्याला पुन्हा गेटवर आणले, तेव्हा तो अधिक आक्रमक झाला.

अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पोलिसांमध्ये लष्करी अधिकाऱ्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. एअरलाइनने या अधिकाऱ्याला 'नो-फ्लाय' यादीत (No-Fly List) टाकण्याची प्रक्रियाही सुरु केली आहे. स्पाइसजेटने या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पोलिसांना दिले असून, योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेबद्दल लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT