Operation Mahadev: श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा! 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत 3 दहशतवादी ढेर, त्यापैकी एक पहलगाम हल्ल्यातील संशयित?

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या हरवान भागातील लिडवास परिसरात आज (सोमवार) सकाळी दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव' (Operation Mahadev) राबवण्यात आले.
Operation Mahadev
Jammu And KashmirDainik Gomantak
Published on
Updated on

Operation Mahadev: जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या हरवान भागातील लिडवास परिसरात सोमवारी (28 जुलै) सकाळी दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव' (Operation Mahadev) राबवण्यात आले. या कारवाईदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) जोरदार चकमक झाली. सुरक्षा दलांना यात मोठे यश मिळाले असून, 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. विशेष म्हणजे, पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Attack) सामील असलेला सुलेमान (Suleman) देखील मारला गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गुप्त माहिती आणि कारवाई

भारतीय लष्कराच्या चिनार कोरनुसार लिडवास परिसरात पहाटे गोळीबार सुरु झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस (Police), लष्कर आणि सीआरपीएफच्या (CRPF) संयुक्त पथकाने मुलनारच्या वनक्षेत्रात (Forest Area) घेराव घालून शोध मोहीम (Search Operation) सुरु केली होती. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हरवानच्या मुलनार परिसरात ही दहशतवादविरोधी मोहीम हाती घेण्यात आली होती.

Operation Mahadev
Operation Sindoor: पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार होता? शाहबाज शरीफ यांनी स्पष्टच सांगितलं

3 दहशतवादी ठार, 2 जखमी

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल संशयित ठिकाणाजवळ पोहोचताच, तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला, ज्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) सुलेमान शाह याचा समावेश असल्याची चर्चा आहे.

सध्या हे ऑपरेशन अजूनही सुरु असून, दोन दहशतवादी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. ड्रोनच्या (Drone) सहाय्याने तिन्ही मृतदेह पाहिले गेले आहेत. सूत्रांनुसार, हे तिन्ही दहशतवादी विदेशी नागरिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपले असण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरुच आहे.

Operation Mahadev
Operation Sindhu: 1000 भारतीयांना घेऊन इराणहून दिल्लीला येणार विमान! इस्त्रायलविरुद्धच्या युद्धादरम्यान इराणकडून एअरस्पेस पुन्हा ओपन

पहलगाम हल्ल्याशी संबंधाचा संशय

'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ठार झालेले हे तीन दहशतवादी 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील (Terrorist Attack) संशयित (Suspects) असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहलगाम हल्ल्यात 26 निशस्त्र लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) सुरु केले होते.

Operation Mahadev
Operation Sindoor: 8 तासांत पाकड्यांचं काम तमाम... सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितली 'ऑपरेशन सिंदूर'ची Inside Story

आता 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत ठार झालेले दहशतवादी पहलगाम हल्ल्याचे संशयित असल्याची माहिती समोर येत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आसिफ फौजी (Asif Fauji), सुलेमान शाह (Suleman Shah) आणि अबू तल्हा (Abu Talha) या तीन दहशतवाद्यांची स्केचेस (Sketches) जारी करण्यात आली होती. 'ऑपरेशन महादेव'मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये सुलेमानचा समावेश असल्याचे सांगितले जात असले तरी, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com