Manoj Pande Kashmir Visit Twitter/@proshillong
देश

काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून झालेल्या गदारोळानंतर लष्करप्रमुख मनोज पांडे काश्मीर दौऱ्यावर

काश्मीर खोऱ्यातील शांतता आणि समृद्धीची ही पहाट आहे आणि ती कायम राखली पाहिजे.

दैनिक गोमन्तक

Manoj Pande Kashmir Visit: काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर दहा दिवसांच्या आत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे शनिवारी 21 मे रोजी दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर पोहोचले. लष्करप्रमुख म्हणून जनरल पांडे यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. आपल्या दौऱ्यात लष्करप्रमुख नियंत्रण रेषेवरील परिस्थितीसह खोऱ्यातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतील. लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, लष्करप्रमुख प्रथम उत्तर काश्मीरला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवर पोहोचले आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला.

लष्करप्रमुखांना दिलेली माहिती

फील्ड कमांडर्सनी जनरल पांडे यांना घुसखोरी विरोधी ग्रीड आणि फील्ड फोर्टिफिकेशन आणि पाकिस्तानसोबतच्या युद्धविराम करारापासून नियंत्रण रेषेवर शांतता कशी राखली गेली याबद्दल माहिती दिली. कमांडर्सनी असेही सांगितले की नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा धोका कायम आहे. यावेळी लष्करप्रमुखांना सीमेवरील आर्मी-सिटिझन कनेक्टबाबतही माहिती देण्यात आली.

सैनिकांच्या सेवांचे कौतुक

लष्कर प्रमुख यांच्यासोबत उत्तर कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सचे कमांडर, लेफ्टनंट जनरल एडीएस औजला, एलओसीच्या भेटीदरम्यान होते. लष्करप्रमुखांनी नियंत्रण रेषेची प्रतिष्ठा राखत पूर्णपणे सतर्क राहण्याचे निर्देश दिले. जनरल पांडे यांनी सैनिकांचे धाडस आणि सेवांचे कौतुक केले.

पोलिस आणि प्रशासनाचे कौतुक

नियंत्रण रेषेला भेट दिल्यानंतर लष्करप्रमुख शनीनगर येथील चिनार कॉर्प्सच्या मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी काश्मीर खोऱ्यातील अंतर्गत सुरक्षेबाबत सविस्तर माहिती घेतली. जनरल पांडे यांनी काश्मीर खोऱ्यात शांतता आणि विकास राखण्याच्या कामाची प्रशंसा केली. या कामासाठी त्यांनी स्थानिक प्रशासन, जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर निमलष्करी दलांचेही कौतुक केले. जनरल पांडे म्हणाले की, काश्मीर खोऱ्यातील शांतता आणि समृद्धीची ही पहाट आहे आणि ती कायम राखली पाहिजे.

10 दिवसांपूर्वी श्रीनगरजवळील बडगाम तहसीलमध्ये कार्यरत असलेल्या काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मीर खोर्‍यात निदर्शने झाली होती आणि काश्मिरी पंडितांनी त्यांना खोर्‍याबाहेर हलवण्याची मागणी केली होती आणि सुरक्षेची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT