Fire breaks out at Fast Food Centre in Aquem Dainik Gomantak
देश

Aquem Fire: आके येथील फास्ट फूड सेंटरला मध्यरात्री भीषण आग; 25 लाखांचे नुकसान, आगीचे कारण अस्पष्ट

Fire breaks out at Fast Food Centre in Aquem: आके येथील यशोधन रुग्णालयाच्या जवळील एका दुकानाला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून मोठी हानी झाल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

आके येथील यशोधन रुग्णालयाच्या जवळील एका दुकानाला शुक्रवारी पहाटे ३ वाजता अचानक आग लागून मोठी हानी झाल्याची घटना समोर आली आहे. परिसरात अचानक उठलेल्या धुराच्या लोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी जवानांना सुमारे तासभराहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दुकानातील सर्व साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच इतर मालसाठा पूर्णतः जळून खाक झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या आगीत जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यातील दिलासादायक बाब म्हणजे, मडगाव अग्निशमन दलाने सुमारे ४ लाख रुपयांची मालमत्ता सुरक्षित वाचविण्यात यश मिळवले आहे. तरीही, आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

SCROLL FOR NEXT