UGC, CUCET 2022 News, CUCET 2022 Notification News  Dainik Gomantak
देश

CUCET 2022: केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रियेला एप्रिलपासून सुरवात

UGC ने जाहीर केलेल्या परिपत्रकानूसार ही परीक्षा 13 भाषांमध्ये आयोजित केली जाईल.

दैनिक गोमन्तक

CUCET 2022 अधिसूचना: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CUET) जाहीर केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. ही परीक्षा 13 भाषांमध्ये होणार असल्याची माहिती यूजीसीने दिली आहे. दिल्ली विद्यापीठ, जेएनयू आणि जामियासह सर्व केंद्रीय विद्यापीठांना पुढील शैक्षणिक वर्षापासून CUET च्या आधारावर प्रवेश घ्यावा लागेल. (CUCET 2022 Notification News)

ही परीक्षा (Exam) हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, आसामी, बंगाली, पंजाबी, उडिया आणि इंग्रजी भाषेत घेतली जाईल. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाईल. परीक्षेची तपशीलवार माहिती nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. परीक्षेचे अर्ज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. राज्य किंवा खाजगी डीम्ड विद्यापीठे देखील या परीक्षेतून संलग्नता घेऊ शकतात. जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की मोठ्या संख्येने केंद्रीय विद्यापीठांनी CUET 2022 मध्ये त्यांचा सहभाग सुनिश्चित केला आहे. त्याचा तपशील लवकरच nta.ac.in वर प्रसिद्ध केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT