Another drone conspiracy of Pakistan failed Dainik Gomantak
देश

पाकिस्तानची पुन्हा नापाक हरकत,भारताचं सडेतोड उत्तर

पाकिस्तान(Pakistan) सीमेवरून काश्मीर खोऱ्यात काही शस्त्रे पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यानंतर संपूर्ण जम्मू शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानकडून(Pakistan) भारतावर(India) काल पुन्हा एकदा ड्रोन हल्ला(Drone Attack) करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जम्मू पोलिसांनी(Jammu Police) हा ड्रोन हल्ला हाणून पाडला आहे.तसेच सीमेपलीकडून आलेला मोठा शस्त्र(Weapons) साठाही जप्त करण्यात आला आहे. जम्मू पोलिसांनी सीमेवरून ड्रोनने टाकलेले 2 हँडग्रेनेड(Hand Grenade) व एक पिस्तूल जप्त केले असून ते ट्रकने श्रीनगरला पाठवायचा प्लॅन सीमेपलीकडून करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

या घटने नंतर जम्मू पोलिसांनी दावा केला आहे की जम्मूच्या विभागीय भागात पाकिस्तानने ड्रोनद्वारे सीमेवरून पाठविलेले शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आले आहे. जम्मूचे एसएसपी चंदन कोहलीच्या मते, त्यांना गुप्तचर यंत्रणांकडून सतत माहिती मिळत होती की पाकिस्तान सीमेवरून काश्मीर खोऱ्यात काही शस्त्रे पाठविण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यानंतर संपूर्ण जम्मू शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता आणि प्रत्येक वाहनांची कडक तपासणीही केली जात होती.

जम्मू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच तपासणी दरम्यान पोलिसांनी तपासणीसाठी जम्मूच्या विभागीय भागात एक ट्रक (JK 13 E 00211 ) थांबवला होता.पोलिसांची ही नाकाबंदी पाहून ट्रक चालक तेथून निघण्याचा प्रयत्न करीत होता, ज्यामुळे सुरक्षा दलातील जवानांना त्याच्यावर शंका आली दरम्यान, सुरक्षा दलाने या ट्रकची झडती घेतली असता या ट्रकमधून 2 हातबॉम्ब आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आला. हा ट्रक पुलवामा येथे राहणारा मुंताझर मंजूर हा चालवित होता, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

जम्मू पोलिसांचा असा दावा आहे की सुरुवातीच्या तपासणीत हे सर्व शस्त्रे सीमेवरून ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत टाकण्यात आल्याची माहिती मिळाली असून मुंतज़ीर मंजूर यांना ही शस्त्रे काश्मीरमध्ये नेण्याचे काम सोपविण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपास सुरू असून आरोपी चालकाची चौकशी केली जात आहे.

काहीदिवसापुर्वीच सुरक्षा दलाकडून दोन वेळेस अशीच कारवाई करण्यात अली होती, पण काही दिवसातांच हा जवळपास तिसरा ड्रोन हल्ला सुरक्षा दलाकडून हाणून पडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT