Another horrific case of rape and torture has come to light in Manipur Dainik Gomantak
देश

Manipur Violence: ती चिमुकल्यांना घेऊन पळत होती अन् नराधम...; सामुहिक बलात्काराचे आणखी एक हृदयद्रावक प्रकरण

Manipur Violence Updates: त्या वेळी मी बेशुद्ध पडली. नंतर जेव्हा मी शुद्धीवर आली तेव्हा मी मेईटी लोकांच्या घरामध्ये असल्याचे लक्षात आले.

Ashutosh Masgaunde

Another Case of Rape and Torture has Come to Light in Manipur:

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये बलात्कार आणि अत्याचाराची आणखी एक भयानक घटना समोर आली आहे.

सध्या मदत शिबिरात राहणाऱ्या पीडितेने पोलिसांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. यामध्ये ३ मे रोजी घडलेल्या गुन्ह्याचा खुलासा करण्यात आला आहे.

या ३७ वर्षीय विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे की, पाच-सहा जणांनी मला पकडून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.

माझा विरोध असूनही मला खाली पाडण्यात आले. त्यानंतर त्यांनी माझा लैंगिक छळ सुरू केला. मी मदतीसाठी ओरडूनही कोणाकडूनही मदत मिळाली नाही.

यानंतर आणखी काही लोक त्यांच्यात सामील झाले. त्या वेळी मी बेशुद्ध पडली. नंतर जेव्हा मी शुद्धीवर आली तेव्हा मी मेईटी लोकांच्या घरामध्ये असल्याचे लक्षात आले.

चुराचंदपूर जिल्ह्यातील महिलेने गुरुवारी बिष्णुपूर महिला पोलिस ठाण्यात एफआयआर आणि वेगळी तक्रार दाखल केली.

यामध्ये ३ मे रोजी घडलेल्या भीषण घटनेची माहिती देण्यात आली. या दिवशी ईशान्येकडील राज्यात जातीय हिंसाचार उसळला होता. (Manipur Violence)

गैर-आदिवासी महिलेने आरोप केला आहे की 3 मे रोजी मणिपूरमधील सर्वाधिक हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांपैकी एक असलेल्या चुराचंदपूरमध्ये जमावाने हल्ला केला आणि त्यांची घरे जाळली.

जेव्हा ती आपल्या कुटुंबासह आणि शेजाऱ्यांसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्यावर काही पुरुषांनी गंभीर हल्ला केला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

एफआयआर नोंदवल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. इम्फाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपासासाठी हे प्रकरण चुराचंदपूर पोलिस स्टेशनकडे पाठवले आहे.

मी माझ्या भाचीला पाठीवर घेऊन माझ्या दोन्ही मुलांना पकडून माझ्या वहिनीसह घटनास्थळावरून पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

तीही एका मुलाला पाठीवर घेऊन माझ्या पुढे धावत होती. मग मी अडखळली आणि रस्त्यावर पडली.

माझ्या घरापासून फक्त अर्धा किलोमीटर चालल्यानंतर मला उठता येत नव्हते. माझी वहिनी माझ्याकडे धावत आली आणि माझ्या भाचीला माझ्या पाठीवरून उचलून माझ्या दोन मुलांसह पळत सुटली.

आपली आणि आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी आणि सामाजिक बहिष्कार टाळण्यासाठी आपण ही घटना यापूर्वी उघड केली नाही, असेही पीडितेने सांगितले.

या महिलेवर रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, इंफाळ या दोन्ही ठिकाणी उपचार करण्यात आले.

या महिलेने सांगितले की, माझी कोणतीही चूक नसताना माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे मला झालेला आघात आणि वेदना जाणवू लागल्याने आता मी पुढे येऊन ही तक्रार दाखल करण्याचे ठरवले आहे.

माझ्यावर अत्यंत भयंकर लैंगिक आणि शारीरिक अत्याचार करणाऱ्या दोषींना योग्य ती शिक्षा द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT