भारतीय सैन्याने आणखीन 147 महिलांना स्थायी कमिशन पदवी प्रदान केली जाणार आहे. Dainik Gomantak
देश

भारतीय सैन्यात आणखीन 147 महिलांना स्थायी कमिशन पदवी प्रदान

प्रशासकीय कारणांमुळे काही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती रोखण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारव्दारे दाखल केलेल्या स्पष्टीकरणात्मक याचिकेची स्पष्टता येणे बाकी आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली: भारतीय सैन्याने (Indian army) आणखीन 147 महिलांना स्थायी कमिशन पदवी (Standing Commission degree for women) प्रदान केली जाणार आहे. यात एकूण 615 अधिकाऱ्यांपैकी 424 महिलांना स्थायी कमिशन देण्यात आले आहे. प्रशासकीय कारणांमुळे काही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती रोखण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्र सरकारव्दारे (Central Government) दाखल केलेल्या स्पष्टीकरणात्मक याचिकेची स्पष्टता येणे बाकी आहे.

17 फेब्रुवारी 2020 ला या संदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आला होता. महिलांना लष्करात समान संधी देण्यात यावी असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले. सरकारने लष्करात महिलांकडे नेतृत्त्व देण्यास नकारात्मक भूमिका घेतली होती. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला होता.

या निर्णयाला केंद्र सरकारने आव्हान दिल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. यावर सर्वोच्च न्यायालयाने सैन्यात महिलांना समान संधी देण्याबाबत निर्णय घेतला असून याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे. महिलांना शारिरीक मर्यादा, सामाजिक नियम यामुळे महिलांना नेतृत्त्वापासून नाकारले जाऊ शकत नाही. त्यामुळे महिलांबाबतची मानसिकता सरकारने बदलावी आणि महिलांसाठी कमांड पोस्ट पद तयार करण्याचे आदेश न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सरकारला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT