N Chandrababu Naidu Arrest Dainik Gomantak
देश

Watch Video: आंध्र प्रदेशात मध्यरात्री रंगलं अटकनाट्य, माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू सीआयडीकडून ताब्यात

N Chandrababu Naidu: आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना नांद्याला येथे अटक केली. आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही पूर्व गोदावरी जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

Ashutosh Masgaunde

Andhra Pradesh CID Arrested Former Chief Minister N Chandrababu Naidu In Charges Of Curroption:

आंध्र प्रदेशच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक केली आहे. त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

नायडू यांच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आंध्र प्रदेश पोलिसांनी पूर्व गोदावरी जिल्ह्यात एन चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही ताब्यात घेतले.

एन चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, उच्च रक्तदाब आणि साखरेची माहिती मिळाल्यानंतर सीआयडीने चंद्राबाबूंना वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. आम्ही जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार आहोत.

शनिवारी पहाटे ३ वाजता चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी सीआयडीचे एक पथक आले होते. तेव्हा तेथे जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला.

एसपीजी दलानेही नियमानुसार सकाळी 5.30 वाजेपर्यंत चंद्राबाबू नायडू यांना अटक करू शकत नाही, असे सांगून पोलिसांना परवानगी नाकारली.

त्यानंतर अखेर सकाळी ६ वाजता चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या घरातून खाली बोलावून अटक करण्यात आली. त्यांना कौशल्य विकास घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाजपकडून अटकेचा निषेध

आंध्र प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्षा पुरंदेश्वरी यांनी चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा देताना त्यांच्या अटकेचा निषेध केला आहे. पुरंदेश्वरी यांनी ट्विट केले की, "चंद्राबाबू नायडूंना आज अटक करण्यात आली. चंद्राबाबू नायडू यांना योग्य सूचना न देता, एफआयआरमध्ये त्यांचे नाव नसताना, कायदेशीर प्रक्रिया न पाळता अटक करणे योग्य नाही. भाजप त्याचा निषेध करतो."

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आंध्र प्रदेशचे मंत्री आणि सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते असा दावा करत आहेत की, तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी 118 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. याशिवाय 350 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्याही त्यांच्यावर आरोप आहे.

चंद्राबाबू नायडू यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांना अटक केले जाण्याची भीती व्यक्त केली होती. पोलीस संपूर्ण प्रकरण समजून न घेता काम करत असल्याचे माजी मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. कौशल्य विकास घोटाळ्यात त्यांना विनाकारण गोवले जात आहे. त्यांनी याला राजकीय षडयंत्र म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT