Andhra Pradesh Boiler Explosion Dainik Gomantak
देश

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Tablets India Limited Clarification: अपघात घडल्यानंतर सुरुवातीला आलेल्या काही बातम्यांमध्ये या कारखान्याचा उल्लेख 'टॅब्लेट्स इंडिया' किंवा 'टॅब्लेट्स इंडिया लिमिटेड हेल्थकेअर' असा करण्यात आला होता.

Manish Jadhav

Tablets India Limited Clarification: आंध्र प्रदेशातील श्रीसिटी विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (SEZ) 3 ऑक्टोबर रोजी एका कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या दुर्देवी घटनेत पाच कामगारांचा मृत्यू झाला असून 10 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या काही कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा वाढला. या दुर्देवी घटनेनंतर 'टॅब्लेट्स (इंडिया) लिमिटेड' या प्रसिद्ध औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले.

'टॅब्लेट्स इंडिया'च्या नावाबाबत भ्रम का निर्माण झाला?

अपघात घडल्यानंतर सुरुवातीला आलेल्या काही बातम्यांमध्ये या कारखान्याचा उल्लेख 'टॅब्लेट्स इंडिया' किंवा 'टॅब्लेट्स इंडिया लिमिटेड हेल्थकेअर' असा करण्यात आला होता. दोन्ही कंपन्यांच्या नावात खूप मोठे साधर्म्य असल्याने, हा अपघात 'टॅब्लेट्स (इंडिया) लिमिटेड' या कंपनीच्या कारखान्यातच झाल्याची चर्चा सुरु झाली. यामुळे सर्वसामान्यांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये मोठा गैरसमज निर्माण झाला.

कंपनीने काय दिले स्पष्टीकरण?

हा गैरसमज दूर करण्यासाठी 'टॅब्लेट्स (इंडिया) लिमिटेड'ने तात्काळ पत्रक जारी करुन स्पष्ट केले की, ज्या कारखान्यात हा स्फोट झाला तो कारखाना 'टीआयएल हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड' (TIL Healthcare Private Limited) या स्वतंत्र कंपनीचा आहे. या दोन्ही कंपन्या कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या आणि स्वतंत्र आहेत. दोन्ही कंपन्यांमध्ये कोणतीही सामायिक मालकी किंवा व्यवस्थापन नाही.

तसेच श्रीसिटी येथे आमचा कोणताही कारखाना किंवा उत्पादन प्रकल्प कार्यरत नाही, असे सांगत टॅब्लेट्स इंडियाने या दुर्घटनेशी असणारा आपला संबंध फेटाळून लावला. कंपनीने अपघातात जीव गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांप्रती गाढ संवेदना व्यक्त केल्या आणि बातम्या देताना माध्यमांनी दोन्ही कंपन्यांमधील फरक स्पष्ट करावा, असे आवाहनही केले.

घटनेच्या उच्चस्तरीय तपासाचे आदेश

या भीषण अपघातानंतर आंध्र प्रदेश सरकारने घटनेच्या उच्चस्तरीय तपासाचे आदेश दिले आहेत. कारखान्यातील सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले होते का आणि अपघात नेमका कशामुळे घडला, याचा सखोल तपास अधिकारी करत आहेत. प्राथमिक अहवालानुसार, बॉयलरमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने हा स्फोट झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला. या प्रकरणी एका निष्काळजी बॉयलर निरीक्षकाला निलंबित करण्यात आले असून, तांत्रिक बिघाड की मानवी चूक, या दोन्ही कोनातून तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

SCROLL FOR NEXT