राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) स्तरीय प्रादेशिक परिषद (Regional Conference) भारतात 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. अफगाणिस्तानच्या संदर्भात ही परिषद आयोजित करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भारताच्या निमंत्रणाला अनेक देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मध्य आशियाई देश, तसेच रशिया (Russia) आणि इराण (Iran) यांनीही परिषदेत सहभागी होण्याचे निश्चित केले आहे. सर्व मध्य आशियाई देश या फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच सहभागी होत आहेत.
पाकिस्तान-चीनलाही दिले आमंत्रण
या परिषदेसाठी चीन आणि पाकिस्तानलाही निमंत्रित करण्यात आले असून औपचारिक प्रतिसादाची प्रतीक्षा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानने यात सहभागी होणार नसल्याचे माध्यमांद्वारे सूचित केले आहे.
तर दुसरीकडे तालिबानने अफगाणिस्तानात परकीय चलनाच्या वापरावर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ऑगस्टच्या मध्यात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय चलनाचे अवमूल्यन होऊ लागले आणि देशातील चलनाचा साठा परदेशात जमा झाला.
तालिबानला आंतरराष्ट्रीय समुदायाने सरकार म्हणून मान्यता दिलेली नाही
अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे त्रासलेल्या, बँकांकडे रोख रक्कम संपत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने आतापर्यंत तालिबानी प्रशासनाला सरकार म्हणून मान्यता देण्यास नकार दिला आहे. दरम्यान, देशांतर्गत अनेक व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये केले जात होते. त्याचबरोबर दक्षिण सीमेवरील व्यापार मार्गांच्या जवळ असलेल्या भागात पाकिस्तानी रुपयाचा वापर केला जात होता. परंतु, याला पूर्णविराम देत तालिबानचे प्रवक्ते जबिउल्ला मुजाहिद यांनी जाहीर केले की, आतापासून जो कोणी देशांतर्गत व्यवसायासाठी विदेशी चलन वापर करेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.