Ukraine Dainik Gomantak
देश

Ukraine: बॉम्बस्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

रशियाकडून झालेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. युक्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यास दुजोरा दिला आहे. (An Indian student was killed in a bomb blast in Ukraine)

मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी कर्नाटक राज्यातील असून युक्रेनमधील खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. युक्रेनवरील रशियन हल्ला हा सहावा दिवस आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात काल झालेली चर्चा अपयशी ठरली आहे. त्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी असणाऱ्या खार्कीव्हसह इतर प्रमुख शहरांवर गोळीबकार करण्यास सुरुवात केली आहे. यातच आज खार्किवमध्ये झालेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत म्हटले की, "आम्ही दुःखी आहोत. खार्किवमध्ये आज सकाळी एका भारतीय विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाला. मंत्रालय त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो."

याच पाश्वभूमीवर ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 'रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी असणाऱ्या कीवच्या उत्तरेकडील भागात आणि चेर्निहाइव्ह या शहरांमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. दाट लोकवस्तीच्या भागामध्ये रशियन सैन्याकडून तोफ गोळ्याचा मारा केला जात आहेत. रशियन हल्ल्यात आत्तापर्यंत युक्रेनचे 70 सैनिक ठार झाले आहेत. रशियन हल्ल्यानंतर पाच दिवसांत जवळपास 3.5 दशलक्ष युक्रेनियन निर्वासितांनी शेजारी असणाऱ्या पोलंडमध्ये आश्रय घेतला आहे.'

पोलंडच्या उप मंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केले की, 'रशियन आक्रमणानंतर सुमारे 350,000 लोक युक्रेनमधून पोलंडमध्ये दाखल झाले आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

SCROLL FOR NEXT