An Government Employee Cannot Be Fired For Marrying Second Time Says Allahabad High Court Dainik Gomantak
देश

दुसरे लग्न केले म्हणून कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढता येणार नाही, हायकोर्टाचा निर्णय

Ashutosh Masgaunde

An Government Employee Cannot Be Fired For Marrying Second Time Says Allahabad High Court:

उत्तर प्रदेशातील एका सरकारी कर्मचाऱ्याने पहिले लग्न झालेले असताना दुसरे लग्न (Bigamy) केल्याच्या आरोपावरुन नोकरीवरुन बडतर्फ करण्यात आले होते. यावर, हा निर्णय अन्यायकारक असल्याचे निरीक्षण अलाहबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायमूर्ती क्षितिज शैलेंद्र यांनी पुढे असे निरीक्षण नोंदवले की, जरी कर्मचाऱ्याने दुसरे लग्न केले असले तरी त्याला सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकत नाही. कारण उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारी नोकर वर्तणूक नियमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्याने दुसरे लग्न केल्यास केवळ किरकोळ शिक्षेची तरतूद आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रभात भटनागर नावाच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ते बरेली जिल्हा विकास अधिकारी यांच्या कार्यालयात कर्मचारी होते. पण एकाचवेळी दोन लग्न केल्याच्या आरोपावरून त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

सेवेतून बडतर्फ करण्यापूर्वी कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, पहिल्या पत्नीने सादर केलेल्या पुराव्यानुसार त्यांनी याचिकाकर्त्याचे दोन कागदपत्रे वगळता इतर कोठेही पती म्हणून नाव वापरले नाही. त्यामुळे याचिकाकर्त्याचे दुसरे लग्न सिद्ध करणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

उत्तर प्रदेश सरकारी नोकर वर्तणूक नियमांमध्ये अशी तरतूद आहे की, जर एखाद्या विवाहीत सरकारी नोकरदाराने सरकारच्या परवानगीशिवाय दुसरे लग्न केले तर तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्याच्या स्वरूपात फक्त किरकोळ शिक्षा दिली जाते. त्याला सेवेतून बडतर्फ केले जाऊ शकत नाही.

न्यायमूर्ती क्षितिज शैलेंद्र यांनी न्यायालयात सांगितले की, 'हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींचा विचार करता, न्यायालय आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर कर्मचाऱ्याने दुसरा विवाह केल्याचे कोणतेही कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच अशा गुन्ह्यासाठी किरकोळ शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्याची नोकरी हिरावता येणार नाही.

यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याला पुन्हा नोकरीवर रुजू करण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्याला नोकरीतून बडतर्फ केल्याच्या दिवसापासून आर्थिक मदत देण्यात यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT