Indigo Flight Dainik Gomantak
देश

Indigo Flight: महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अमृतसरमध्ये एकाला अटक

Indigo Flight: इंडिगो विमानातील एका प्रवाशाला महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Manish Jadhav

Indigo Flight: इंडिगो विमानातील एका प्रवाशाला महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. महिला क्रू मेंबरचा विनयभंग केल्याप्रकरणी शनिवारी राजासांसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी राजिंदर सिंगला अटक केली.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी रविवारी सायंकाळी त्याला न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

दरम्यान, एसजीआरडी विमानतळावर तैनात इंडिगो एअरलाइनचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक अजय कुमार यांनी विमानतळ पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, जालंधरमधील कोटली गावचे रहिवासी राजिंदर सिंग दुबईहून (Dubai) इंडिगो एअरलाइनच्या फ्लाइटमध्ये प्रवास करत होते. फ्लाइट दरम्यान, आरोपीने मद्य प्राशन करुन महिला क्रू मेंबरचा विनयभंग केला.

तपास अधिकारी एएसआय तरसेम सिंग यांनी सांगितले की, आयपीसीच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीला (Accused) ड्युटी मॅजिस्ट्रेटसमोर हजर केल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT