Amit Shah
Amit Shah  Dainik Gomantak
देश

Amit Shah CAA Remark: 'CAA लागू होणार नाही, असे स्वप्न पाहणारे...,'

दैनिक गोमन्तक

Amit Shah CAA Remark: निवडणुकीच्या वातावरणात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजेच CAA बाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु होऊ शकते. या प्रकरणाला पुन्हा हवा देण्याचे काम गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. एका मुलाखतीत अमित शाह यांनी स्पष्ट केले की, 'ज्यांना वाटते की सरकारने CAA विधेयक गुंडाळून ठेवले आहे, तर ते चुकीचे आहेत. याबाबत लोकांनी संभ्रमात राहू नये.'

दरम्यान, टाईम्स नाऊ नवभारतच्या एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, 'सीएए हे एक वास्तविकता आहे. हा देशाचा कायदा आहे. त्याची अंमलबजावणी न झाल्याबद्दल स्वप्न पाहणारे चूक करत आहेत.' मात्र, असे अमित शहा पहिल्यांदाच बोलले, असे नाही. याआधीही शहांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीचा उल्लेख केला आहे.

प्रार्थना स्थळ कायद्यावर दिलेले उत्तर

या कार्यक्रमादरम्यान अमित शहांनी प्रार्थनास्थळ कायद्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गृहमंत्री म्हणाले की, हे प्रकरण अद्याप न्यायालयात आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. कारण अयोध्या निकालानंतर जे वाद निर्माण झाले आहेत, त्यात या कायद्याबाबत एक आव्हान समोर आले आहे. माझा विश्वास आहे की, प्रत्येक कायदा न्यायालयाच्या कायदेशीर छाननीतून गेला पाहिजे. यावर सरकार उत्तर दाखल करणार आहे.'

दुसरीकडे, चीनबाबत अमित शहा म्हणाले की, चीनसोबतचा सीमावाद खूप जुना आहे. जे आज प्रश्न उपस्थित करत आहेत, त्यांच्या काळात चीनमध्ये एक लाख एकरहून अधिक जमीन गेली, त्यांनी इतिहास वाचावा. आमच्या सरकारचा विचार केला तर आम्ही ठाम आहोत की एक इंचही जमीन परकीय देशाच्या ताब्यात जाऊ शकत नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

SCROLL FOR NEXT