Amit Shah: भाजपचे मंत्री माईकच सोडेनात; अखेर अमित शाह यांनीच बंद करायला लावले भाषण!

भाजपच्या चिंतन शिबिरातील प्रकार; 'हे चालणार नाही,' अशा शब्दांत फटकारले
Amit Shah Anil Vij
Amit Shah Anil VijDainik Gomantak

Amit Shah: काही राजकीय नेते एकदा बोलू लागले की, त्यांना कुठे थांबायचे ते कळत नाही. बोलण्याच्या नादात ते वाहवत जातात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती असलेल्या एका कार्यक्रमात असाच प्रकार घडला. खुद्द भाजपचेच मंत्री माईक सोडेनात. चार वेळा चिठ्ठी देऊनही त्यांनी भाषण सुरूच ठेवले. अखेर अमित शाह यांनी या मंत्र्याला फटकारत भाषण बंद करायला लावले.

Amit Shah Anil Vij
Rajnath Singh: 'PoK मधील अत्याचाराचे परिणाम पाकला भोगावे लागतील'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे गुरूवारी हरियाणा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक कार्यक्रमात उपस्थिती लावली. फरीदाबाद येथे भाजपच्या जन उत्थान रॅलीतही त्यांनी संबोधित केले. त्यानंतर सूरजकुंड येथे भाजपच्या दोन दिवसीय चिंतन शिबिराची सुरवात त्यांच्या भाषणाने झाली. याच कार्यक्रमात हा प्रकार घडला.

ही जागा लांबलचक भाषण देण्याची नाही, असे अमित शाह यांचे मत होते. त्यामुळे आधीच अनिल विज यांना 5 मिनिटांचा अवधी दिला गेला होता. पण, 8 मिनिटांनंतरही विज यांचे भाषण सुरूच होते.

विज यांना अमित शाह यांच्या स्वागताप्रित्यर्थ काही बोलायचे होते. त्यानंतर अमित शाह बोलणार होते. पण अमित शाह यांच्या स्वागतानंतर विज हे हरियाणाचा इतिहास आणि हरित क्रांतीतील राज्याचे योगदान सांगू लागले.

Amit Shah Anil Vij
Rajasthan: 8 वर्षीय मुलींची स्टॅम्प पेपरवर होतेय विक्री, गेहलोत सरकारला NHRC ची नोटीस

या काळात विज यांच्या शेजारीच बसलेल्या अमित शाह यांनी त्यांना वारंवार रोखण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला एक चिठ्ठी देऊन भाषण थांबविण्यास सांगण्यात आले. त्यानंतर शाह यांनी स्वतःचा माईक सुरू करून त्यावर बोटांनी आवाज करत आवरते घेण्यास सांगितले. तरीही विज बोलतच राहिले. अखेर अमित शाह यांनी खडसावले की, तुम्ही तुमचे भाषण लवकर संपवा.

एवढे सांगुनही ऐकतील ते अनिल विज कसले? त्यानंतरही विज यांनी बोलण्यासाठी काही वेळ घेतलाच. भाषणतील एक महत्वाचा मुद्दा अद्याप बाकी असल्याचे विज म्हणाले. अखेर अमित शहा चिडून म्हणाले की, अनिलजी मला माफ करा, पण हे चालणार नाही.

या चिंतन शिबिरात भाजपशासित 9 राज्यातील मुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसह राष्ट्रीय सुरक्षिततेवर या शिबिरात चर्चा होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिबिरात मार्गदर्शन करू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com