Hijab Dainik Gomantak
देश

Karnataka: हिजाबच्या वादातून कर्नाटकात आजपासून दहावीपर्यंतच्या शाळा झाल्या सुरू

कर्नाटकात हिजाबचा वाद इतका टोकाला गेला की तो राज्याबरोबरच देश आणि राजकारणातही पसरला.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकात हिजाबचा वाद इतका टोकाला गेला की तो राज्याबरोबरच देश आणि राजकारणातही पसरला. कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घातल्याने बरीच निदर्शने झाली, ज्यावर राजकीय वक्तृत्व आणि निषेध अजूनही सुरू आहेत. हिजाबच्या (Hijab) मुद्द्यावरून देशात वेगवेगळ्या ठिकाणी वादाचे वातावरण इतकं चिघळलं आहे. या सगळ्या दरम्यान कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सोमवारी राज्यात आजपासून दहावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची घोषणा केली. राज्यात आंदोलन सुरू असताना सर्व विद्यार्थी शाळेत जाताना दिसत होते. (Karnataka School Reopen Latest News)

शाळांमध्ये शांतता राखण्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे आवाहन

गेल्या महिन्यात, कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी प्री-युनिव्हर्सिटी महिला महाविद्यालयात हिजाबच्या विरोधात निदर्शने सुरू झाली. ज्याचा निषेध संपूर्ण देशात पोहोचला आणि आज हिजाबच्या वादावरून देशभरात गदारोळ सुरू आहे. राज्यातील हिजाब वादावर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार, 14 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून इयत्ता 1 ते 10 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. रविवारी हुबळी येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी इयत्ता 10वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत सांगितले होते. त्याचबरोबर शाळा सुरू झाल्यावर शाळांमध्ये शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुलीने हिजाब घालून शाळेत प्रवेश केल्याने शिक्षक आणि पालकांमध्ये वाद

शाळा सुरू होताच विद्यार्थी शाळेत जाताना दिसत होते. त्याच वेळी, राज्यातील मंड्या जिल्ह्यातील रोटरी शाळेबाहेर हिजाब पुन्हा एक मुद्दा बनला. जिथे शाळेच्या बाहेरील गेटवरच शिक्षक आणि विद्यार्थ्याचे पालक यांच्यात वाद सुरू झाला. एक विद्यार्थिनी हिजाब घालून शाळेत प्रवेश करत असताना शिक्षकाने तिला गेटवरच थांबवले आणि हिजाब काढून आत जाण्यास सांगितले, यावरून तिच्या कुटुंबीयांमध्ये आणि शिक्षकांमध्ये वाद सुरू झाला.

शाळा सुरू झाल्याची घोषणा केल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा अधिकारी, पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सध्या राज्यात उच्च वर्गाची शाळा आणि महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. परिस्थितीचा आढावा घेऊनच ते उघडले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शाळा प्रशासन डीसी आणि एसपी यांना शांतता समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT