उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election 2022) मतमोजणी सुरू आहे. अश्यातच राज्याच्या अमेठी निवडणूक निकाल 2022 च्या लाइव्ह अपडेट्समध्येही मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या ताज्या ट्रेंडनुसार, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय सिंह हे समाजवादी पक्षाचे उमेदवार महाराजी प्रजापती सपा यांच्यावर आघाडीवरती आहेत. ट्रेंडनुसार भाजपचे संजय सिंह यांना आतापर्यंत 1200 मते मिळाली आहेत, तर महायुतीचे उमेदवार महाराजी प्रजापती यांना आत्तापर्यंत 600 मते मिळाली आहेत. बहुजन समाज पक्षाच्या रागिणी या लढतीमध्ये मागे पडल्या असल्याचे दिसून आले तर यावेळी समाजवादी पक्षाने राष्ट्रीय लोकदलाशिवाय अनेक छोट्या पक्षांशी युती केली आहे. (Amethi Lok Sabha constituency is known as the stronghold of the Gandhi family)
यूपीच्या रायबरेली विधानसभेच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीनंतर भाजप (BJP) उमेदवार आदिती सिंह 1419 मतांच्या फरकाने पहिल्या क्रमांकावरती आहेत. तर दुसरीकडे, सपाचे उमेदवार राम प्रताप यादव आहेत.
विशेष म्हणजे अमेठी लोकसभा मतदारसंघ हा गांधी परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, पण 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीने हा समज मोडून काढला आणि भाजपच्या बाजूने स्मृती झुबिन इराणी यांना विजय मिळालेला आहे. सध्या गरिमा सिंह अमेठी विधानसभेतून भाजपच्या आमदार आहेत.
येथे काँग्रेसचे (Congress) बंडखोर राजे संजय सिंह हे भाजपच्या तिकीटावरती एकमेकांविरुद्ध, भाजपचे बंडखोर आशिष शुक्ला काँग्रेसच्या तिकीटावरती एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. गायत्रीप्रसाद प्रजापती हे गुन्हेगारी खटल्यात आरोपी ठरले, तर समाजवादी पक्षाने त्यांच्या पत्नी महाराजांना तिकीट दिले. संजय सिंह यांच्याशिवाय त्यांच्या दोन्ही पत्नी गरिमा सिंह आणि अमिता सिंह या येथून आमदार आहेत. पण यावेळी भाजपनेच संजय सिंह यांना पुढे केले. संजय सिंह हे दीर्घकाळापासून त्यांच्याशी संबंधित आहेत.
आजपर्यंत काँग्रेससोबत आणि गांधी घराण्याशीही जवळचे मानले जाते आहे. त्यांनी काँग्रेस नेते संजय गांधी यांच्या काळात राजकारणाला सुरुवात केली आहे. अमेठीला काँग्रेसचा बालेकिल्ला बनवण्याचे काही श्रेय राजा संजय सिंह यांनी काँग्रेस सरकारमध्ये राहुन मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या विरोधात काँग्रेसच्या रिंगणात आहेत. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे आमदार आले होते निवडून 1951 मध्ये पहिल्यांदा अमेठीमध्ये निवडणुका झाल्या, त्यानंतर कुंवर रणजय सिंह हे येथून पहिले आणि अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते.
यानंतर 1980 आणि 1985 मध्ये राजकुमार संजय सिंह, 1989, 1991 मध्ये हरिचरण यादव, 1993 मध्ये जमुना मिश्रा, 1996 मध्ये राम हर्ष सिंह हे देखील येथून आमदार होते. अमिता सिंह 2022 मध्ये भाजप आणि 2007 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावरती विजयी झाल्या होत्या. 2012 मध्ये समाजवादी पक्षाचे गायत्री प्रसाद प्रजापती आणि 2017 मध्ये भाजपच्या गरिमा सिंह या येथून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.