उत्तराखंडमध्ये भाजप 46 जागांवर आघाडीवर

भाजपची 20 जागांची आघाडी कायम
uttarakhand assembly election result 2022 live vote counting today bjp congress aap win loss seats
uttarakhand assembly election result 2022 live vote counting today bjp congress aap win loss seats dainik gomantak
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीनंतर 23 दिवसांनी, उत्तराखंडमधील (Uttarakhand) सर्व 70 विधानसभा जागांचे निकाल आज घोषित केले जात आहेत. त्यामुळे यावेळी सत्तेची धुरा कोणत्या पक्षाच्या हाती येणार हेही स्पष्ट होणार आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने 20 जागांची आघाडी कायम ठेवली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि हरिद्वार शहर मतदारसंघातील भाजप उमेदवार मदन कौशिक हे मतमोजणीच्या चार फेऱ्यांमध्ये जवळपास 300 मतांनी पिछाडीवर आहेत. सतपाल ब्रह्मचारी सध्या येथून आघाडीवर आहेत.

uttarakhand assembly election result 2022 live vote counting today bjp congress aap win loss seats
AAP ठरणार मोठा पक्ष व्हीआयपी जागांवर कोण पुढे, कोण मागे?

गदरपूर विधानसभेच्या पाचव्या फेरीत अरविंद पांडे यांना 3305 तर काँग्रेसचे प्रेमानंद महाजन यांना 5136 मते मिळाली. अरविंद यांना आतापर्यंत 27145 तर प्रेमानंद महाजन यांना 20973 मते, अरविंद पांडे 6172 मतांनी आघाडीवर आहेत.

हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून भाजप पुढे आहे. जागेश्वर मतदारसंघ तिसऱ्या फेरीत भाजप 1708, काँग्रेस 1190.

चौथ्या फेरीनंतर हरिद्वार ग्रामीणमध्ये भाजपचे (BJP) उमेदवार स्वामी यतीश्वरानंद 1350 मतांनी आघाडीवर आहेत. पौरी जिल्ह्यातील श्रीनगर या एकमेव जागेवर भाजप पिछाडीवर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल आणि भाजपचे उमेदवार धनसिंग रावत यांच्यात लढत आहे.

दुसऱ्या फेरीत खतीमाचे भाजपचे सीएम पुष्कर सिंग धामी यांना 4876 आणि काँग्रेसचे (Congress) भुवन सिंग कापरी यांना 3938 मते मिळाली. आतापर्यंत पुष्कर यांना 8861 तर कापरी यांना 8870 मते मिळाली आहेत. गंगोलीहाट विधानसभेच्या (Assembly) दुसऱ्या फेरीत भाजप 2592, काँग्रेस 1580, काँग्रेस 1012 मागे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com