Lord Shankara Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh: अमेरिकन महिलेने भगवान शंकराला अर्पण केला सोन्याचा मुकुट, वर्षभरापूर्वी मुस्लिम धर्म सोडून...

Uttar Pradesh News: गाझियाबादच्या डासना मंदिरात एका अमेरिकन डॉक्टर महिलेने भगवान शंकराला सोन्याचा मुकुट आणि श्रृंगाराचे सामान अर्पण केले आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh News: गाझियाबादच्या डासना मंदिरात एका अमेरिकन डॉक्टर महिलेने भगवान शंकराला सोन्याचा मुकुट आणि श्रृंगाराचे सामान अर्पण केले आहे. महिलेने अर्पण केलेला हा सोन्याचा मुकुट 19 तोळ्याचा असल्याचे सांगितले जात आहे.

हा मुकुट उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील दोन कारागिरांनी तयार केला आहे. यासोबत असा दावा केला जात आहे की, मुकुट दान करणारी महिला डॉक्टर आधी मुस्लिम होती, मात्र वर्षभरापूर्वी तिने हिंदू धर्म स्वीकारला.

मूळची गुजरातची अमेरिकन महिला डॉक्टर

श्री पंचदासनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आणि डासना मंदिराचे पीठाधीश्वर यती नरसिंहानंद गिरी यांनी सांगितले की, महिला डॉक्टर मूळची गुजरातची (Gujarat) आहे. ती सध्या अमेरिकेत राहते आणि तिथे औषधोपचार करते.

महामंडलेश्वर यांच्या म्हणण्यानुसार, "महिला डॉक्टर सुमारे 5 वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या संपर्कात आली. त्यानंतर आमच्यात विचारांची देवाणघेवाण सुरु झाली." त्यांनी दावा केला की, "माझ्या बोलण्याने प्रभावित होऊन मुस्लिम महिला डॉक्टरने धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. सुमारे एक वर्षापूर्वी, तिने सनातन धर्म स्वीकारला आणि भगवान महादेव शिवाला गुरु मानले."

सोन्याचा मुकुट घातला

यती नरसिंहानंद गिरी यांनी सांगितले की, आता महिला डॉक्टरने डासना मंदिरात स्थापित पारेश्वर महादेवासाठी सोन्याच्या मुकुटासह संपूर्ण श्रृंगाराच्या वस्तू पाठवल्या आहेत. मुकुट हा सुमारे 19 तोळ्याचा आहे.

शिवशक्ती धाम डासना येथे झालेल्या रुद्राभिषेकानंतर पंडित सनोज शास्त्री व पंडित कृष्णवल्लभ भारद्वाज यांनी पारेश्वर महादेवाला सजविले.

यती नरसिंहानंद गिरी हे गाझियाबादच्या (Ghaziabad) डासना येथील शिवशक्ती धाम मंदिराचे पीठाधीश्वर आहेत. ते श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्वर देखील आहेत. याआधी, ते अनेक वादात सापडले आहेत. विशेष म्हणजे, द्वेषपूर्ण भाषणासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT