Rahul Gandhi Disqualified
Rahul Gandhi Disqualified Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi Disqualified: राहुल गांधी निलंबन प्रकरणावर अमेरिकेचं महत्त्वाचं विधान, नेमकं काय म्हटलं?

दैनिक गोमन्तक

Rahul Gandhi disqualified as Member of Parliament: सध्या फक्त भारतच नाही तर अमेरिकेतही राहुल गांधींबद्दल चर्चा सुरु आहे. राहुल गांधींचा उल्लेख करत अमेरिकेने म्हटले की, कायद्याचे राज्य आणि न्यायालयीन स्वातंत्र्याचा आदर हा कोणत्याही लोकशाहीचा पाया आहे. 

भारतातील (India) न्यायालयांमध्ये सुरु असलेल्या गांधींच्या खटल्यावर नजर ठेउन आहे. लोकशाही मूल्यांवरील सामायिक बांधिलकीमुळे अमेरिका भारताशी जोडली गेली आहे, असे ते म्हणतात. 

भारतातील राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) संसदेच्या सदस्यत्वावर विचारलेल्या प्रश्नावर उपप्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले, "आम्ही दोन्ही लोकशाही मजबूत करण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाही तत्त्वांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित करत आहोत." अमेरिका (America) भारताशी चर्चा करत आहे की राहुल गांधींशी, असे विचारले असता. यावर ते म्हणाले की, सध्या त्यांना यावर काहीही बोलायचे नाही. 

मानहानीचा हा खटला 2019 मध्ये कर्नाटकात झालेल्या रॅलीशी संबंधित आहे. या रॅलीदरम्यान राहुल यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षाही सुनावली आहे.

अपात्रतेनंतर देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. आता अमेरिकेनेही या प्रकरणी आपले मत मांडले आहे. 

दरम्यान, यामुळे देशभरात कॉग्रेस कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालुन मोर्च काढले आहेतराहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याच्या विरोधात महागठबंधनच्या नेत्यांनी बिहारमधील पाटणा येथे काळ्या पट्ट्या बांधून निषेधार्थ मोर्चा काढला होता. या व्हिडिओमध्ये सर्व नेत्यांनी हाताला काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत.

तसेच काँग्रेसचे आमदार आज चेन्नईतील विधानसभेत काळे शर्ट घालून आले. त्यांच्या समर्थनार्थ आमदारांनी फलकही हातात घेतले होते.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात.

राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. नोटीशीनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT