Amazon Employee Work Life Balance Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: 'प्रत्येक गोष्टीला होकार देणं म्हणजे चांगला कर्मचारी नव्हे'; Amazon कर्मचाऱ्याच्या Work-Life Balance पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष

Viral Post News: आजच्या वेगवान कॉर्पोरेट संस्कृतीत कामाचे तास निश्चित राहिलेले नाहीत. ऑफिस संपल्यानंतरही ई-मेल, मेसेज, ऑनलाइन मीटिंग्स आणि सतत उपलब्ध राहण्याची अपेक्षा अनेक कर्मचाऱ्यांवर असते.

Sameer Amunekar

आजच्या वेगवान कॉर्पोरेट संस्कृतीत कामाचे तास निश्चित राहिलेले नाहीत. ऑफिस संपल्यानंतरही ई-मेल, मेसेज, ऑनलाइन मीटिंग्स आणि सतत उपलब्ध राहण्याची अपेक्षा अनेक कर्मचाऱ्यांवर असते. अशा परिस्थितीत काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात समतोल कसा राखायचा, हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहतो. याच विषयावर एका Amazon महिला कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केलेला अनुभव सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.

'स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःलाच विसरले'

दीपिका नावाच्या या कर्मचाऱ्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत कामाच्या पद्धतीत केलेल्या काही बदलांविषयी सांगितले. तिच्या मते, पूर्वी चांगला कर्मचारी होण्यासाठी प्रत्येक कामाला त्वरित होकार देणे, प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देणे आणि नेहमी उपलब्ध राहणे आवश्यक आहे, असे तिला वाटायचे. मात्र, कालांतराने या सवयीमुळे मानसिक ताण वाढत असल्याची जाणीव झाली. तिने आता स्वतःसाठी काही स्पष्ट मर्यादा ठरवल्या असून त्यामुळे कामाची गुणवत्ता टिकून राहण्याबरोबरच मानसिक आरोग्यही सुधारल्याचे ती सांगते.

प्रत्येक नोटिफिकेशनला लगेच प्रतिसाद देण्याची गरज नाही

दीपिकाच्या मते, प्रत्येक मेसेज किंवा ई-मेलला त्वरित उत्तर देणे आवश्यक नसते. जर काही वेळ उशिरा उत्तर दिल्याने कामावर परिणाम होत नसेल, तर स्वतःवर अनावश्यक दबाव घेण्याचे कारण नाही. सतत मोबाईल किंवा लॅपटॉपकडे लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःला थोडा वेळ देणे अधिक महत्त्वाचे असल्याचे तिने नमूद केले.

क्षमतेनुसारच स्वीकारा नवीन जबाबदाऱ्या

तिने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. आधीपासूनच कामाचा ताण असताना प्रत्येक नवीन प्रोजेक्ट स्वीकारण्याऐवजी स्वतःची क्षमता आणि वेळ लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा. गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या स्वीकारल्याने कामाचा दर्जा घसरतो आणि वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होतो, असे तिचे मत आहे.

ऑफिस आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवण्याचा सल्ला

दीपिकाने ऑफिसचा वेळ संपल्यानंतर कामाचे ओझे घरी न आणण्यावर विशेष भर दिला. काम संपल्यानंतर लॅपटॉप बंद करून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले. सतत ऑफिसचाच विचार करत राहिल्यास मानसिक थकवा वाढतो आणि वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेणे कठीण होते.

तिने इतरांशी स्वतःची तुलना करण्याची सवयही सोडल्याचे सांगितले. प्रत्येकाचा करिअरचा प्रवास वेगळा असतो, त्यामुळे इतरांच्या यशामुळे स्वतःवर अनावश्यक दबाव आणू नये, असा संदेश तिने दिला.

प्रश्न विचारायला अजिबात संकोच करू नका

कामाच्या ठिकाणी काही गोष्ट समजली नाही तर वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांना प्रश्न विचारण्यास मागे हटू नये, असेही दीपिकाने स्पष्ट केले. योग्य वेळी विचारलेला एक प्रश्न भविष्यातील अनेक चुका टाळू शकतो, असे तिचे मत आहे.

मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याचा संदेश

पोस्टच्या शेवटी दीपिकाने एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. मर्यादा आखणे म्हणजे काम टाळणे किंवा कमी मेहनत करणे नव्हे. उलट, मानसिक आरोग्य जपत अधिक परिणामकारक आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्याचा तो मार्ग आहे. तिचा हा अनुभव सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक नोकरदारांनी आजच्या कॉर्पोरेट संस्कृतीचे वास्तव मांडल्याबद्दल तिचे समर्थन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT