Cloudburst near the Amarnath cave,  Siddhesh Shirsat / Dainik Gomanatak
देश

Amarnath cave: बाबा अमरनाथ येथे गुहेजवळ ढगफुटी

आजूबाजूच्या प्रदेशातील लोकांना सिंधु नदीपासून दूर राहण्याचे आवाहन (Amarnath cave)

Siddhesh Shirsat

जम्मू-काश्मीरमधील (J&K) हिंदू तीर्थक्षेत्र (Hindu Pilgrimage site)असलेले अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी (Cloudburst near the Amarnath cave) झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे जाहीर केले. जम्मू-काश्मीर राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाची दोन पथके (2 Squads of Disaster management ) अमरनाथ ते जवळ खबरदारी म्हणून तैनात करण्यात आली आहेत. तसेच गांधरबल येथे एक अतिरिक्त पथक तैनात करण्यात आले आहे.

अमरनाथ येथील स्थानिक प्रशासन आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या मदतीने आजूबाजूच्या प्रदेशातील लोकांना सिंधू नदी(Sindhu River) पासून वेगळे राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rain ) आणि ढगफुटीमुळे (Cloudburst) नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Central Minister Amit Shah) यांनी या घटनेविषयी ट्विट करून माहिती दिली आहे, सदर घटनेबद्दल जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिंह यांच्याशी बातचीत झाल्याचे अमित शहा यांनी सांगितले, तसेच मदत कार्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफचे पथक (NDRF Squad) पाठवत असल्याचे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT