Gujarat Election Result
Gujarat Election Result Dainik Gomantak
देश

Gujarat Election Result: अपेक्षित यश मिळाले नसले तरी आम आदमी पक्षाने केली 'ही' मोठी कमाई

Akshay Nirmale

Gujarat Election Result: गुजरातमध्ये भाजपने एकट्याने 157 जागा जिंकत विरोधकांना आणि इतर पक्षांना काही संधीच ठेवलेली नाही. तरीदेखील मोठ्या तयारीने गुजरात विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने एक मोठी कमाई या निवडणुकीतू साधली आहे.

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत. त्यातील 157 जागा भाजपने जिंकल्या आहेत. भाजपचा हा विजय विक्रमी आणि ऐतिहासिक आहे. या निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष देखील मोठ्या तयारीने उतरला होता. केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनी वारंवार गुजरातचे दौरे केले होते. प्रचारसभा घेतल्या होत्या. मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी केली होती.

आप ची ही तयारी पाहुन आप गुजरातमध्ये काँग्रेसची जागा घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. किंबहुना प्रचारातही भाजपचा जोर काँग्रेसपेक्षा केजरीवाल यांच्या आप पक्षावर टीकेचा होता. आपच्या राजकारणामुळेच भाजपने सरळसरळ स्थानिक आणि बाहेरचे असे नरेटिव्ह तयार केले. एवढ्या तयारीनंतरही आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये केवळ पाच जागा जिंकल्या. म्हणजेच एका दृष्टीने आपसाठी हा मोठा पराभवच ठरला. आप तब्बल 35 जागांवर दुसऱ्या स्थानी राहिला आहे. पण तरीदेखील आपने एक मोठी कमाई या पराभवातूनही केली आहे.

आपचे तीन बडे नेते या निवडणुकीत पराभूत झाले. यात मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी, प्रदेश अध्यक्ष गोपाल इटालिया आणि पाटीदार नेते अल्पेश कथिरिया यांचा समावेश आहे. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला 13 टक्के मते मिळाली. त्यामुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आता आम आदमी पक्ष देशभरात स्वतःच्या नावावर आणि चिन्हावर निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे या निवडणुकीत आम आदमी पार्टीला अपेक्षित यश मिळालेले नसले तरी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे हे पक्षाच्या दृष्टीने मोठी कामगिरी आहे. 2017 च्या निवडणुकीत आपला 0.62 टक्के मते मिळाली होती. तर तेव्हा आपला एकही जागा जिंकता आली नव्हती.

दरम्यान, या निवडणुकीत खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाने एकुण 11 मुस्लीम आणि दोन हिंदू असे एकूण 13 उमेदवार उभा केले होते. त्या सर्वांचा पराभव झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT