Allu Arjun Dainik Gomantak
देश

Allu Arjun: अल्लू अर्जुनचा जेलमधील मुक्काम वाढणार का? सायंकाळी होणार सुनावणी

Court Hearing On Allu Arjun Arrest: पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनला संध्या थिएटरप्रकरणी आज (13 डिसेंबर) हैदराबाद पोलिसांनी अटक केली.

Manish Jadhav

पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनला संध्या थिएटरप्रकरणी आज (13 डिसेंबर) हैदराबाद पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी तात्काळ अल्लूला न्यायालयात हजर केले. न्यायमूर्ती जुववादी श्रीदेवी यांच्यासमोर झालेल्या न्यायालयीन सुनावणीत वकील निरंजन रेड्डी आणि अशोक रेड्डी यांनी अभिनेता अल्लू अर्जुन मार्फत दाखल केलेल्या रद्दबातल याचिकेवर लंचनंतर सुनावणी घेण्याची विनंती केली. या याचिकेत अल्लूविरोधातील पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला (Court) सुनावणीदरम्यान विनंती केली की, पोलिसांना सोमवारपर्यंत अल्लूला अटक करण्यापासून रोखणारा आदेश जारी करावा. अल्लूच्या वकिलांनी केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत अतिरिक्त सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ते पोलिसांशी चर्चा करतील आणि दुपारी 4.00 पर्यंत उत्तर देतील.

न्यायमूर्ती श्रीदेवी यांनी या प्रकरणावरील सुनावणी 4.00 वाजेपर्यंत पुढे ढकलली आहे. अल्लूला अटकेपासून संरक्षण मिळणार की नाही हे न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी अल्लूविरुद्ध कलम 105, कलम 118(1), बीएनएस कायद्याच्या 3/5 या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यातील कलम 105 हे अजामीनपात्र गुन्ह्याचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT