Allahabad High Court Dainik Gomantak
देश

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Allahabad High Court On Live-in: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने 'लिव्ह-इन रिलेशनशिप'बाबत मोठी टिप्पणी केली आहे.

Manish Jadhav

Allahabad High Court On Live-in: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने 'लिव्ह-इन रिलेशनशिप'बाबत मोठी टिप्पणी केली आहे. एका महत्त्वपूर्ण निर्णयात खंडपीठाने म्हटले की, ‘कोणताही मुस्लिम पुरुष पत्नी असताना 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहण्याचा हक्क सांगू शकत नाही. इस्लाम अशा संबंधांना मान्यता देत ​​नाही.’

दरम्यान, हा आदेश न्यायमूर्ती ए.आर. स्नेहा देवी आणि मोहम्मद शादाब खान यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायमूर्ती मसूदी आणि न्यायमूर्ती एके श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने दिला. याचिकेत दोघांनीही या प्रकरणी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची आणि 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये असताना सुरक्षा पुरवण्याची विनंती केली होती.

महिलेला तिच्या पालकांकडे परत पाठवा

आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले की, प्रथा आणि परंपरा या कायद्याचे समान स्रोत आहेत. घटनेचे कलम 21 रीतीरिवाज आणि परंपरांद्वारे प्रतिबंधित असलेल्या नातेसंबंधाचा अधिकार मानत नाही. या निरीक्षणांसह न्यायालयाने पोलिसांना स्नेहा देवीला सुरक्षिततेत तिच्या पालकांकडे परत पाठवण्याचे आदेश दिले.

याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?

याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सांगितले की, ते प्रौढ आहेत आणि स्वतःच्या इच्छेने 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत आहेत, तरीही मुलीच्या भावाने अपहरणाचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. याचिकेत या एफआयआरला आव्हान देण्यात आले. याशिवाय, याचिकाकर्त्यांच्या शांततापूर्ण जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप न करण्याचा आदेश देण्याची विनंतीही न्यायालयाकडे करण्यात आली.

शादाबला एक मुलगी आहे

सुनावणीदरम्यान, शादाबने 2020 मध्ये फरीदा खातूनसोबत लग्न केल्याचे न्यायालयासमोर समोर आले. विशेष म्हणजे, त्याला एक मुलगी देखील आहे. शादाबची पत्नी फरीदा सध्या तिच्या आई-वडिलांसोबत मुंबईत राहत आहे.

न्यायालयाने काय म्हटले?

खटल्यातील तथ्ये विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, घटनेचे कलम 21 अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये सुरक्षेचा अधिकार प्रदान करत नाही ज्यामध्ये प्रथा आणि परंपरा भिन्न श्रद्धा असलेल्या व्यक्तींना कोणतेही कृत्य करण्यास मनाई करतात. कारण राज्यघटनेच्या कलम 13 मध्येही प्रथा आणि परंपरांना कायद्याचा दर्जा प्राप्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT