Allahabad High Court Has Said That Every Person Has Constitutional Right To Under Go Sex Change Surgery. Dainik Gomantak
देश

'लिंग बदलचा' निर्णय व्यक्तीचा संवैधानिक अधिकार: हायकोर्ट

नेहा म्हणते की, तिला एक पुरुष म्हणून तिचा वावर अधिक सहज वाटतो. लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी तिने अर्ज केला आहे. पण आतापर्यंत यावर तिला कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

Ashutosh Masgaunde

Allahabad High Court Has Said That Every Person Has Constitutional Right To Under Go Sex Change Surgery:

एखाद्या व्यक्तीला शस्त्रक्रियेद्वारे तिचे लिंग बदलयाचे असेल तर तो तिचा संवैधानिक अधिकार असल्याचे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

तसेच, एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने केलेला लिंग बदलाची सर्जरी करण्याची परवानगी मागणारा अर्ज निकाली काढण्याचे निर्देश उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. .

न्यायमूर्ती अजित कुमार यांनी निरीक्षण केले की जर एखाद्या व्यक्तीला लिंग डिसफोरियाचा त्रास होत असेल आणि शारीरिक रचना वगळता, तिच्या भावना आणि गुणधर्म विरुद्ध लिंगाचे असतील तर सर्जिकल पर्यायाद्वारे तिला लिंग बदलण्याचा घटनात्मकदृष्ट्या अधिकार आहे.

कधीकधी अशी समस्या प्राणघातक ठरू शकते, कारण अशा व्यक्तीला खाण्याचे विकार, चिंता, नैराश्य, नकारात्मक स्व-प्रतिमा आणी लैंगिक शरीर रचनेबद्दल नापसंती असू शकते. असा त्रास कमी करण्यात मनोवैज्ञानिक उपाय अयशस्वी झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.
न्यायमूर्ती अजित कुमार

या प्रकरणातील याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयाला विनंती केली की ती लिंग डिसफोरियाने ग्रस्त आहे आणि स्वत: पुरुष म्हणून वावरते. तिला सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी करायची आहे.

याबाबत 11 मार्च रोजी पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे, मात्र अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

यानंतर न्यायमूर्ती अजित कुमार यांनी उत्तर प्रदेश पोलीस महासंचालकांना, महिला कॉन्स्टेबल नेहा सिंगने लिंग बदलासाठी दाखल केलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. याचिकेवर न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारकडूनही उत्तर मागवले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला

याआधी याचिकाकर्त्या नेहा सिंगच्या वकिलाच्या वतीने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे दाखले दिले.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही कारणाशिवाय अर्ज रोखणे चुकीचे असल्याचे म्हटले होते.

सर्वोच्च न्यायालयाने लिंग ओळख हा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा अविभाज्य भाग मानला आहे. जर असा कोणताही नियम नसेल तर राज्याने केंद्राच्या कायद्यानुसार असा कायदा करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT