All Indians will back to the country from Afghanistan: External Affairs Minister S Jaishankar  Dainik Gomantak
देश

अफगाणिस्तानातून सर्व भारतीयांना लवकरच परत आणू: परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणतात की ते अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानचा (Taliban) पूर्ण कब्जा झाला असताना, भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar) यांनी भारतीय नागरिकांची (Indian Citizens) सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ते सर्व आवश्यक पावले उचलत आहेत आणि लवकरच त्यांना मायदेशी परत आणू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तालिबानने अफगाणिस्तान पूर्णपणे ताब्यात घेतल्यानंतर हजारो लोक देश सोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.(All Indians will back to the country from Afghanistan: External Affairs Minister S Jaishankar)

भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणतात की ते अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. ते म्हणतात की ज्या लोकांना भारतात परत यायचे आहे त्यांची चिंता समजून घ्यावी लागेल, तर विमानतळ ऑपरेशन हे सर्वात मोठे आव्हान असेल. ज्यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती दिली आहे की, अफगाणिस्तानमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विशेष अफगाणिस्तान सेलची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा मिळाल्यानंतर देश सोडून जाण्यासाठी मोठ्या संख्येने लोक काबूल विमानतळावर पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. काल काबुल विमानतळावर अमेरिकेचे लष्करी विमान उड्डाण करण्यापूर्वी बरेच लोक विमानाच्या बाहेरून लटकले होते. तर काहीजण विमानाला लटकले असताना खाली पडलेले देखील पाहायला मिळाले.

सध्या भारताच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) बैठकीत अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जावर चर्चा झाली. भारताने अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि तेथे महिला, पुरुष आणि मुले भीतीच्या छायेखाली जगत असल्याचे सांगितले. अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलाविलेल्या या आपत्कालीन बैठकीत अफगाणिस्तानचे प्रतिनिधी गुलाम एम इसकझाई देखील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT