Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

काश्मीरमधील हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली, टार्गेट किलिंगनंतर मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत हिंदू समाजाच्या टार्गेट किलिंगची प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत हिंदू समाजाच्या टार्गेट किलिंगची प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता काश्मीर खोऱ्यात काम करणाऱ्या हिंदू समाजातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा मुख्यालयातच तैनात केले जाईल. (All Hindu employees in Kashmir transferred to district headquarters, big decision after the target killing)

दरम्यान, मंगळवारीही कुलगाममध्ये हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी (Terrorists) गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या 5 महिन्यांतील ही 16 वी टार्गेट किलिंग होती. यानंतर प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वाचा आहे, कारण सुरक्षित ठिकाणीच पोस्टिंग मिळावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत होती. गेल्या महिन्यात बडगामच्या दुर्गम भागातील चांदुरा येथील तहसील आवारात घुसून राहुल भटचीही हत्या करण्यात आली होती.

6 जूनपर्यंत हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी तैनात केले जाईल

यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की, त्याची जिल्हा मुख्यालयात नियुक्ती झाली असती तर आज तो जिवंत असता. बुधवारी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा (Lieutenant Governor Manoj Sinha) यांनी श्रीनगरमध्ये (Srinagar) वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व कर्मचाऱ्यांना 6 जूनपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्यात येणार आहे. काश्मीरमधील दुर्गम भागात जिथे सुरक्षा व्यवस्था कमी आहे, तिथे हिंदू (Hindu), शीख किंवा अल्पसंख्याक समुदायातील कोणत्याही कर्मचाऱ्याला पोस्टिंग दिले जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एवढंच नाही तर या कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर वेळीच सुनावणी व्हावी यासाठी ईमेल आयडी तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सर्व विभागातील निचतम स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबतच्या चिंता दूर करण्याची गरज असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. त्यांनी काही तक्रार केल्यास त्यावर तातडीने कारवाई करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गोवा सरकारचा मोठा निर्णय; चार कनिष्ठ अधिकाऱ्यांची सेवा केली समाप्त!

Hong Kong Fire Video: हाँगकाँगमध्ये भीषण आग! 65 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

SCROLL FOR NEXT