Rakesh Tikait dainik gomantak
देश

UP Election Result 2022: भाजपच्या विजयावर टिकैत यांनी सोडले मौन, म्हणाले...

UP Election Result 2022 : सर्व सरकारे आपापल्या राज्यात शेतकरी आणि मजुरांच्या उन्नतीसाठी काम करतील : टिकैत

दैनिक गोमन्तक

UP Election Result 2022 : देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांचा निकाल लागला असून पाचपैकी चार राज्यात भाजपने आपला झेंडा रोवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने विजय मिळवत मोठा पक्ष ठरला आहे. चार राज्यात भाजपला मिळालेल्या यशामुळे तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपने नेत्रदीपक मुसंडी मारली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. या निकालांना अनेक पक्षांनी हा जनतेचा जनादेश असून आम्ही तो स्विकारतो असे म्हणत पराभव स्विकारला आहे. त्याचवेळी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आपली प्रतिक्रिया देताना मौन सोडले आहे. यावेळी त्यांनी, सर्व विजयी पक्षांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. (All governments will work for the upliftment of farmers and laborers in their state says Rakesh Tikait)

तसेच टिकैत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "लोकशाहीच्या महान उत्सवात जनतेचा निर्णय सर्वोपरि आहे. शेतकरी (farmers)चळवळीने त्याचा परिणाम दाखवून दिला आहे. आम्हाला आशा आहे की स्थापन झालेली सर्व सरकारे आपापल्या राज्यात शेतकरी आणि मजुरांच्या उन्नतीसाठी काम करतील.

दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा (Uttar Pradesh Assembly) निवडणुकीचे निकाल पूर्णपणे स्पष्ट झाले असून योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आपला गड राखत राज्यात मोठा पक्ष म्हणून भाजला (BJP) समोर आणले आहे. भाजप 261 जागांवर तर सपा (SP) 135 जागांवर आघाडीवर होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT