Ukraine Crisis Dainik Gomantak
देश

Ukraine Crisis: 'पापा चिंता मत कीजिए... अक्षतने सांगितली युक्रेनमधील परिस्थीती

डेहराडूनमध्ये (Dehradun) राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीयही युक्रेन आणि रशियामध्ये सुरु झालेल्या युद्धामुळे चिंतेत आहेत.

दैनिक गोमन्तक

रशियाने संपूर्ण सैन्यबळासह युक्रेनवर हल्ला केला आहे. तर दुसरीकडे ब्रिटन आणि अमेरिका या हल्ल्याच्या गंभीर परिणामांचा इशारा देत आहेत. परंतु या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय निषेध आणि निर्बंधांना रशिया मुठमाती देत आहे. याच पाश्वभूमीवर डेहराडूनमध्ये (Dehradun) राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीयही युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये (Russia) सुरु झालेल्या युद्धामुळे चिंतेत आहेत. काही विद्यार्थ्यांनी घरच्यांशी मोबाईलवरुन संवादही साधला आहे. तूर्तास तिकडे बरे असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत. परंतु आज सकाळी आलेल्या घडामोडींनी कुटुंबीय चिंताक्रांत झाले आहेत. (Akshat Joshi From Dehradun Spoke About The Situation In Ukraine)

दरम्यान, राज्य जिल्हा कोरोनेशन हॉस्पिटलचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ आणि प्रांतीय वैद्यकीय आरोग्य सेवा संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष डॉ.डी.पी. जोशी म्हणाले की, युक्रेनमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंब चिंतेत आहेत. आज सकाळी त्यांचा मुलगा अक्षत जोशी याच्याशी मोबाईलवर बोलणे झाले. यावेळी अक्षतने सांगितले की, देशातील बदलत्या घडामोडीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाण्याची समस्या

अक्षतने सांगितले की, ''युक्रेनमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे पिण्याचे पाणीही मॉलमधून विकत आणावे लागत आहे. त्यामुळे ही समस्या कायम आहे.'' अक्षत जोशी युक्रेनच्या खार्किव शहरातून एमबीबीएस करत आहे. तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात आहे.

तसेच, युक्रेनमधील वाढती चिंताजनक परिस्थिती पाहता अक्षत जोशीने कुटुंबीयांच्या सांगण्यावरुन 27 फेब्रुवारीला फ्लाइट बुक केली होती. काही वेळ बोलून झाल्यावर अक्षतचा कॉल कट झाला. त्यानंतर फोन न आल्याने पालक अस्वस्थ झाले. 28 फेब्रुवारीला तो भारतात येणार होता. कीवमध्ये रशियन सैन्याच्या आक्रमणामुळे उड्डाणेही बंद केली आहेत. खार्किवपासून 9-10 तासांचे अंतर पार करुन विमानाने कीवला यावे लागते. त्यानंतर त्याला कीवहून भारताचे विमान पकडायचे होते. सध्या त्याच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर भारतात येण्याचे संकट आहे. तर दुसरीकडे डेहराडूनमध्ये त्याचे कुटुंब चिंतेत आहेत. डेहराडूनमधून युक्रेनची राजधानी कीवसह लिविव, खार्किव सारख्या शहरात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे कुटुंबीय आपल्या सुरक्षेबाबत चिंतेत आहेत.

शिवाय, युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या मुलांना लवकरात लवकर भारतात सुखरुप आणावे, अशी इच्छा या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. हाथीबरकला केंद्रीय विद्यालयातील शिक्षिका रश्मी बिश्त यांचा मुलगा सुर्यांश सिंग बिश्त युक्रेनच्या लिविव्ह मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

SCROLL FOR NEXT