Delhi High Court

 

Dainik Gomantak

देश

Delhi High Court: सुब्रमण्यम स्वामींची याचिका फेटाळली

एअर इंडिया सतत तोट्यात जात आहे आणि सरकार अधिक तोटा सहन करू शकत नाही. टाटा सन्सच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे की एअर इंडियाची बोली लावणारी कंपनी 100% भारतीय आहे. Air India bid

दैनिक गोमन्तक

एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया रद्द करण्याबाबत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (BJP leader Subramanian Swamy) यांनी दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळून लावली आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, निर्गुंतवणुकीची प्रक्रिया हा धोरणात्मक निर्णय आहे.

केंद्र सरकारची (Central Government) बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की एअर इंडिया (Air India) सतत तोट्यात जात आहे आणि सरकार अधिक तोटा सहन करू शकत नाही. टाटा सन्सच्या (Tata Sons) वतीने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगण्यात आले आहे की एअर इंडियाची बोली (Air India bid) लावणारी कंपनी 100% भारतीय आहे.

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या याचिकेत एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची बोली प्रक्रिया मनमानी, भ्रष्ट, दुर्भावनापूर्ण, असंवैधानिक आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. टाटा सन्सने याबाबतीत हेराफेरी केल्याचा आरोपही त्यांनी याचिकेत केला आहे.

स्वामी यांनी अधिवक्ता सत्य साबेरवाल यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत अधिकाऱ्यांची भूमिका आणि कार्यप्रणालीची सीबीआय (CBI) चौकशी आणि त्याच्या तपशीलवार अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याची विनंतीही केली होती.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, केंद्र सरकारने टाटा सन्स कंपनीने (Tata Sons Company) एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमधील 100 टक्के समभाग तसेच 'ग्राउंड हँडलिंग' कंपनी एआयएसएटीएसमधील 50 टक्के समभागांसाठी देऊ केलेली सर्वोच्च बोली स्वीकारली होती.

येथे असे मानले जाते की एअर इंडियाला टाटा समूहाकडे सोपवण्याचे काम या महिन्यात पूर्ण होऊ शकते. नियामक मंजुरीला उशीर झाल्यामुळे डिसेंबरअखेर हा करार पूर्ण व्हायला हवा होता, तो आता एका महिन्यात पूर्ण होईल. 20 डिसेंबर रोजी, या कराराला CCI म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाने देखील मान्यता दिली होती.

25 ऑक्टोबर रोजी सरकारने टाटा सन्ससोबत एअर इंडियाची 18,000 कोटी रुपयांची विक्री करण्यासाठी खरेदी करार केला होता. टाटा या कराराच्या बदल्यात सरकारला 2,700 कोटी रुपये रोख देईल आणि एअरलाईनवरील 15,300 कोटी रुपयांचे थकबाकीदार कर्ज घेणार आहे.

अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सरकारला या डील अंतर्गत रोख रक्कम मिळेल. 2007-08 मध्ये इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडियाला सातत्याने तोटा होत होता. 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे एकूण 61,562 कोटी रुपयांची थकबाकी होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT