Air India Dainik Gomantak
देश

Plane Crash: बापरे...! एअर इंडिया अन् नेपाळ एअरलाईन्सचं विमानं धडकणार होतं, पण

Plane Collided: शुक्रवारी जमिनीपासून हजारो फूट उंचीवर दोन विमाने टक्कर होण्यापासून वाचली, मात्र वैमानिकांच्या हजरजबाबीपणामुळे मोठी दुर्घटना टळली.

Manish Jadhav

Plane Collided: शुक्रवारी जमिनीपासून हजारो फूट उंचीवर दोन विमाने टक्कर होण्यापासून वाचली, मात्र वैमानिकांच्या हजरजबाबीपणामुळे मोठी दुर्घटना टळली.

एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सचे विमान आकाशात इतकी जवळ आले होते की, त्यांची कधीही टक्कर होऊ शकते, परंतु वॉर्निंग सिस्टमने वैमानिकांना सतर्क केले, त्यानंतर हा अपघात टळला. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.

दरम्यान, नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) हवाई वाहतूक नियंत्रक विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणासाठी निलंबित केले आहे.

CAAN चे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी सांगितले की, नेपाळ एअरलाइन्सचे एअरबस A-320 विमान शुक्रवारी सकाळी क्वालालंपूरहून काठमांडूला (Kathmandu) येत होते. त्याचवेळी एअर इंडियाचे विमान नेपाळला येत होते. ही दोन्ही विमाने जवळपास एकमेकांना धडकणार होती.

निरौला म्हणाले, एअर इंडियाचे विमान 19 हजार फूट उंचीवरुन खाली येत होते. त्याच ठिकाणी नेपाळचे विमान 15 हजार फूट उंचीवर होते. प्रवक्त्याने सांगितले की, जेव्हा रडारवर दोन्ही विमाने एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसले तेव्हा नेपाळ एअरलाइन्सचे विमान 7000 फूट उंचीवर गेले.

दुसरीकडे, नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. घटनेच्या वेळी नियंत्रण कक्षाचे प्रभारी असलेल्या तीन अधिकाऱ्यांना CAAN ने निलंबित केले आहे. सध्या एअर इंडियाकडून (Air India) याबाबत कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT