Air India: भारतातील टाटा ग्रृपने एअर इंडियासाठी 470 नवीन विमानांची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमुळे एकसोबत तीन देशांसोबत करार केला आहे. यामध्ये फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे.
फ्रान्सच्या एअरबस कंपनीकडून 250 विमान,आणि अमेरिकेच्या बोइंग कंपनीकडून 220 विमान भारताने ऑर्डर केले आहेत. याबरोबरच, एअरबस विमानामध्ये जे इंजिन वापरले जाईल ते इंजिन ब्रिटनची कंपनी रॉल्स कंपनी तयार करेल.
इतकेच नाही तर विमानाचे महत्वाचे काही भाग ब्रिटनमध्ये बनवले जातील. 470 विमानातील 70 विमान हे दूरवरच्या प्रवासासाठी बनवले जातील. आत्तापर्यंत कोणत्याही भारतीय एअरलाइनने केलेल्या ऑर्डरमध्ये टाटा ग्रृपने केलेली ही सगळ्यात मोठी ऑर्डर आहे.
भारताच्या एअर इंडिया आणि फ्रान्सच्या एअरबसच्या कंपनीमध्ये करार होत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांनी व्हर्चुअल मीटींगद्वारे संवाद साधला.
पंतप्रधान मोदींनी भारत आणि फ्रान्स( France ) च्या राजनैतिक संबंधासाठी मोठाकरार असल्याचे म्हटले आहे.तर, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून एरोस्पेस क्षेत्रामध्ये हा करार मोठे यश आहे आणि दोन्ही देशांसाठी हा ऐतिहासिक करार आहे असे म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिके( USA )च्या बोइंग आणि भारताच्या एअर इंडियामध्ये झालेल्या करारानंतर अमेरेकिने जाहीर केलेल्या व्हाइट हाऊसने म्हटले आहे की ,या डीलमुळे अमेरिकेतील लोकांना नोकऱ्या मिळतील. त्याचबरोबर, भारत- अमेरिकेच्या संबंधासाठीदेखील मोठा उपयोग होईल असे म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.