Mahatma Gandhi AI Image  
देश

AI Images: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सेल्फी काढली असती तर? जगातील महापुरूषांच्या AI प्रतिमा पाहा

एआयने जवळपास प्रत्येक क्षेत्रात गुणात्मक झेप घेतली आहे.

Pramod Yadav

AI Images: सध्या अनेक शहर तसेच विविध शहरातील महत्वाची आणि प्रसिद्ध ठिकाणे यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या कृत्रिम तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रतिमा तयार केल्या जातात. या प्रतिमा अधिक स्पष्ट आणि उत्कृष्ट इमेज क्वालिटी असल्याने पाहण्यास सुरेख दिसतात.

सुरूवातीला दिल्लीसह देशातील महत्वाच्या शहरांचे फोटो समोर आले त्यानंतर प्रत्येक राज्यातील लोक एआयच्या माध्यमातून कसे दिसतात याचे फोटो देखील समोर आले.

Bhimrao Ramji Ambedkar AI Image


AI तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातील महापुरूषांच्या प्रतिमा तयार करण्यात आल्या आहेत. यात भारतातील राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा एकाने प्रसिद्ध केल्या आहेत.

यामध्ये महात्मा गांधी सेल्फी घेतानाची AI प्रतिमा तयार करण्यात आली आहे. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देखील प्रतिमा निर्माण करण्यात आल्या आहेत. दोन्ही प्रतिमा अप्रतिम दिसत आहेत.

Abraham Lincoln AI Image

प्रतिक पाटील नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवरून या प्रतिमा शेअर करण्यात आल्या आहेत. गांधी आणि आंबेडकर यांच्यासह अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि नेते अब्राहम लिंकन यांची देखील सेल्फी घेतानाचा प्रतिमा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

martin luther king jr AI Image

याशिवाय मार्टीन ल्यूथर किंग ज्युनियर याची प्रतिमा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अलिकडे अनेक बदल पाहायला मिळत आहेत. एआयने जवळपास प्रत्येक क्षेत्रात गुणात्मक झेप घेतली आहे. AI प्रतिमा निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे न्यूरल नेटवर्क्सने सर्वांना अवाक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT