youth Dainik Gomantak
देश

Agneepath:'तुम्ही वीर असू शकता, अग्निवीर नाही...,' सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले

Agneepath Yojana: अग्निपथ योजनेबाबतच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी दिलेल्या टिप्पणीने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

दैनिक गोमन्तक

Supreme Court: अग्निपथ योजनेबाबतच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी दिलेल्या टिप्पणीने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अधिवक्ता शर्मा यांना उत्तर देताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, तुम्ही शूर असू शकता पण तुम्ही अग्निवीर असू शकत नाही. न्यायाधीशांची हलकेफुलकी टिपण्णी ऐकून सर्वजण हसू लागले. शर्मा यांनी जनहित याचिका दाखल करुन या योजनेच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, वकील शर्मा अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जनहित याचिका दाखल करत असतात. ते म्हणाले, 'अग्निपथ योजनेच्या (Agneepath Yojana) विरोधात जनहित याचिका दाखल करणारा मी पहिला आहे म्हणून त्यांनी हे सांगितले.'

दुसरीकडे, न्यायालयात तीन स्वतंत्र जनहित याचिकांवर सुनावणी सुरु होती. शर्मा, हर्ष अजय सिंग आणि रवींद्र सिंह शेखावत यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. अग्निपथ योजनेअंतर्गत 17 ते 21 वयोगटातील तरुणांची भरती केली जाणार आहे. ही भरती चार वर्षांसाठी केली जाणार असून त्यानंतर 25 टक्के जवानांना सैन्यात कायम केले जाईल.

तसेच, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, लोक दोन वर्षांपासून हवाई दलात भरतीची वाट पाहत आहेत. आता त्यांची 20 वर्षांची कारकीर्द केवळ चार वर्षांची होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रलंबित जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित केल्या आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड, सूर्यकांत आणि एएस बोपण्णा यांच्या खंडपीठाने केरळ उच्च न्यायालय (Kerala High Court), पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय आणि उत्तराखंड (Uttarakhand) यांना जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यास सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT