Army Chief General Manoj Pandey Dainik Gomantak
देश

लष्करप्रमुखांची घोषणा, अग्निपथ योजनेतील भरती प्रक्रिया दोन दिवसांत होणार सुरु

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, भरती प्रक्रियेसंबंधी अधिसूचना येत्या दोन दिवसांत जारी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

अग्निपथ योजनेबाबत देशभरात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, भरती प्रक्रियेसंबंधी अधिसूचना येत्या दोन दिवसांत जारी करण्यात येणार आहे. ही अधिसूचना भारतीय लष्कराच्या http://joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जारी केली जाईल.

ते पुढे म्हणाले की, या वर्षी डिसेंबरपर्यंत लष्कराला पहिला अग्निवीर मिळेल आणि पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ते तिन्ही सेवांमध्ये ऑपरेशनल आणि नॉन-ऑपरेशनल तैनातीसाठी तैनात केले जातील.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे पुढे म्हणाले, 'लवकरच भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासंबंधीची अधिसूचना येत्या दोन दिवसांत जारी केली जाईल. यानंतर, नोंदणी, भरती प्रक्रिया इत्यादींचे वेळापत्रक सैन्याकडून जारी केले जाईल.

ते पुढे म्हणाले की, 'भरती प्रक्रिया झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीस पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण सुरु होईल.' एवढंच नाही तर विद्यार्थ्यांच्या (Students) विरोधाच्या प्रश्नावर ते म्हणाले की, 'तरुणांना याबाबत पूर्ण माहिती नाही. एकदा ते त्याचा एक भाग झाल्यानंतर आणि संपूर्ण गोष्ट समजून घेतल्यानंतर ते निषेध करणार नाहीत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT