Burnol is trend on twitter Dainik Gomantak
देश

Burnol ट्विटरवर होतयं ट्रेंड; पुरस्काराच्या नावाला नेटकऱ्यांचे समर्थन

ज्या लोकांना पंतप्रधानांचा हा निर्णय आवडला नाही, ज्या लोकांना त्रास होत असेल, त्या लोकांसाठी #Burnol हे औषध फायदेशीर असल्याची टीका लोकांनी केल्याचे दिसते आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे बदलुन त्याचे नाव ‘मेजर ध्यानचंद पुरस्कार’ असे केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा करताना देशातील अनेक नागरिकांकडून आपल्याकडे याबद्दलची मागणी केली जात होती. आपण त्या लोकांच्या या दृष्टीकोणाला धन्यवाद देतो असे म्हणत या गोष्टीची माहिती दिली आहे. (After the renaming of the Rajiv Gandhi Award, burnol became a trend on twitter)

हा निर्णय घेतल्यानंतर अनेकांकडून सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्हीही प्रतिक्रीया आल्याचे पहायला मिळते आहे. या सर्व प्रतिक्रीयांमध्ये अनेकांनी कॉग्रेसने देशातल्या वेगवेळ्या अस्थापनांना दिलेल्या आपल्या पक्षातील नेत्यांच्या नावांवरुन चांगलीच टीका केली आहे. याच सगळ्या टीका करताना #Burnol ट्रेंड होताना दिसते आहे. ज्या लोकांना पंतप्रधानांचा हा निर्णय आवडला नाही, ज्या लोकांना त्रास होत असेल, त्या लोकांसाठी #Burnol हे औषध फायदेशीर असल्याची टीका लोकांनी केल्याचे दिसते आहे.

दुसरीकडे नेहमीच नाव बदलण्याच्या निर्णयांवरुन भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदी यांना देखील लोकांनी ट्रोल केले असल्याचे पहायला मिळाले आहे. तर अनेकांनी या सगळ्या भानगडींमध्ये #Burnol ची मोफत जाहिरात होत असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT