योगींना खालिस्तान्यांची धमकी; '15 ऑगस्टला तिरंगा फडकवू देणार नाही'

खालिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (SFJ) चा नेता असलेल्या गुरूपतवंत सिंग पन्नूने गुरुवारी लखनऊच्या पत्रकारांना कॉल करून ही धमकी दिली.
UP CM Yogi Adityanath
UP CM Yogi Adityanath Dainik Gomantak
Published on
Updated on

खालिस्तान (Khalistan) समर्थकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना मोठी धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंह पन्नू यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिली आहे की, 15 ऑगस्ट रोजी आम्ही योगी आदित्यनाथ यांना लखनऊच्या विधान भवनात तिरंगा ध्वज फडकू देणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी धमकीचा ऑडिओ माध्यमांना पाठवण्यात आला आहे. (Khalistan supporters threatened Yogi Adityanath not to fly the tricolor On August 15 shk99)

शिख फॉर जस्टिस या भारतातील बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधीत गुरपतवंत सिंग पन्नू यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी मीडिया व्यक्तींच्या फोनवर धमकी देणारा ऑडिओ टाकला आहे. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 15 ऑगस्ट रोजी लखनऊ विधान भवनात ध्वज फडकावू दिला जाणार नाही.

खालिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (SFJ) चा नेता असलेल्या गुरूपतवंत सिंग पन्नूने गुरुवारी लखनऊच्या पत्रकारांना कॉल करून ही धमकी दिली.शीख फॉर जस्टिस गटाशी संबंधित गुरपाखवंत सिंह पन्नू म्हणाला की, योगी आदित्यनाथ यांना 15 ऑगस्टला तिरंगा फडकवू देणार नाही. यापूर्वी पन्नूने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर आणि माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांना देखील धमकी दिली होती.

UP CM Yogi Adityanath
Karnataka: नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लाॅकडाऊन लागू

लखनऊच्या काही पत्रकारांना मिळालेल्या 59 सेकंदांच्या कॉल रेकॉर्डमध्ये पन्नू म्हणाले की, भाजप, आरएसएस आणि पीएम मोदी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना पाठिंबा देत आहेत. यूपीच्या लोकांनी आणि शेतकऱ्यांनी यूपी सरकारला तिरंगा फडकवू देऊ नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com