Yogi Adityanath Dainik Gomantak
देश

गोरखनाथ मंदिर हल्ल्यानंतर योगी आदित्यनाथ गोरखपूरला रवाना, UPATS करणार चौकशी

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जात आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना झाले आहेत. खरंतर, रविवारी धार्मिक घोषणाबाजी केल्यानंतर एका विशिष्ट पंथाच्या तरुणाने गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांवर (Police) धारदार शस्त्राने हल्ला केला. ज्यामध्ये कॉन्स्टेबल गोपाल गौर आणि अनिल पासवान (Anil Paswan) जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमद मुर्तझा अब्बासी असे आरोपी हल्लेखोराचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (After the Gorakhnath temple attack Yogi Adityanath left for Gorakhpur, UPATS will investigate)

दरम्यान, योगी आदित्यनाथ हे गोरक्षपीठाचे पीठाधीश्‍वर असून मंदिरावरील हल्ल्याच्या घटनेनंतर ते गोरखपूरला जात आहेत. दुसरीकडे मात्र, अनेकवेळा गोरखनाथ मंदिरात हल्ल्याच्या धमक्या आल्या आहेत. त्याचवेळी, यूपी पोलीस आणि एटीएस मंदिरावरील हल्ल्याचा तपास करत आहेत. त्याचवेळी, एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार म्हणाले की, ''संपूर्ण तपासाची जबाबदारी एटीएसकडे सोपवण्यात आली असून या प्रकरणात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता दुर्लक्षित करता येणार नाही.'' त्याचवेळी गोरखपूर झोनचे अतिरिक्त महासंचालक (ADG) अखिल कुमार यांनी सांगितले की, ''आरोपीने धारदार शस्त्राने मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याने केलेल्या हल्ल्यात दोन हवालदार जखमी झाले.''

धार्मिक घोषणा देत मंदिरात प्रवेश केला

मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तझा अब्बासी पहिल्या गेटजवळील पीएसी चौकीवर गेला आणि तिथे चौकीवर उपस्थित असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 'अल्लाह हू अकबर' म्हणत मंदिराच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पोलिसांवर हल्ला केला.

आरोपीने केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुर्तजाने मुंबईत केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून त्याच्याकडून धारदार शस्त्रे, एक लॅपटॉप, पॅनकार्ड आणि विमानाचे तिकीट मिळाले आहे. त्याचबरोबर नुकताच दोन लाख रुपयांना महागडा लॅपटॉप खरेदी केल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT