'कुरुप मुलींचीही लग्ने होतात...': कॉलेजच्या पाठ्यपुस्तकात हुंड्याचे 'फायदे'

मुखपृष्ठावर इंडियन नर्सिंग काउंसिल सलेब्स (Indian Nursing Council Celebs) असे लिहिले आहे.
Marriage
MarriageDainik Gomantak
Published on
Updated on

हुंड्याच्या फायद्यांबाबत एका पुस्तकाच्या पानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अशा पाठ्यपुस्तकातून तरुणांना आणि समाजाला काय संदेश जातोय, असा प्रश्न लोकांना पडला आहे. या पुस्तकाचे अनेक सोशल मीडिया (Social Media) यूजर्संनी टीके इंद्राणी यांच्या परिचारिकांसाठीचे समाजशास्त्र पाठ्यपुस्तक म्हणून उल्लेख केला आहे. यामध्ये मेरिट ऑफ डोअरी "मेरिट्स ऑफ डोअरी" असे पानाचे शीर्षक लिहण्यात आले आहे. हे पुस्तक नर्सिंग विद्यार्थ्यांच्या सेलेब्सचा भाग असून त्याच्या मुखपृष्ठावर इंडियन नर्सिंग काउंसिल सलेब्स (Indian Nursing Council Celebs) असे लिहिले आहे.(Even ugly girls get married Dowry benefits in college textbooks)

दरम्यान, फर्निचर, रेफ्रिजरेटर आणि वाहनांसारख्या उपकरणांसह हुंडा नवीन घर उभारण्यासाठी उपयुक्त आहे, असे या पानावर लिहण्यात आले आहे. त्यानंतर, ज्या मुलींना हुंड्यामध्ये पालकांच्या मालमत्तेमध्ये वाटा मिळाला आहे, त्यांना या प्रथेची आणखी एक "योग्यता" म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे. आपल्या देशात हुंडा पद्धतीवर बंदी घालण्यात आली आहे, परंतु ती अजूनही सुरु आहे. हुंड्याच्या मागणीसाठी महिलांचा छळ, हत्या आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या बातम्या अनेकदा तुम्ही वाचल्या असतील. पानावरील शेवटच्या मुद्द्यामध्ये असे लिहिले आहे - 'हुंडा पद्धती कुरुप दिसणाऱ्या मुलींचा विवाह करण्यासाठी मदत करु शकते.'

Marriage
आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी सरकारने स्थापन केले आणखी 13 जिल्हे

शिवाय, अशी पुस्तके महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग आहेत, हे धक्कादायक असल्याचे म्हणत ट्विटर यूजर्संनी या पुस्तकावर टीका केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com