Hemant Soren Dainik Gomantak
देश

महाराष्ट्रानंतर आता झारखंड सरकार पडणार ?

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांच्या मागे तपास यंत्रणा लावल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात दोन आठवड्यापूर्वी सत्ता नाट्याचे प्रयोग संपूर्ण देशाने पाहीले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अंतर्गत वादाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल असे सांगितले. तसेच काही नेते आपला स्वार्थ साधण्यासाठी शिवसेनेचा वापर करुन घेत आहेत. असे ही आरोप झाले होते. यानंतर आता अशीच काहीशी स्थिती झारखंडमध्ये सुरू आहे. (After Maharashtra change government Jharkhand jmm congress government unstable )

एकीकडे तपास यंत्रणा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर मुसक्या आवळत आहेत, तर दुसरीकडे आघाडीचे भागीदार झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि काँग्रेस यांच्यात राष्ट्रपतीपदाच्या संदर्भात अंतर वाढत चालले आहे. याबाबत झारखंड सत्ताधारी आघाडीचे मित्रपक्ष सध्या अशा शंका फेटाळून लावत आहेत, आणि सर्व ठीक असल्याचा दावा करत आहेत. मात्र, रांची आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात झारखंडच्या अडीच वर्षांच्या सरकारबद्दल जोरदार झारखंड सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा सुरू आहेत.

एनडीएने झारखंडमध्ये द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून उभे करून त्यांच्या सहयोगी पक्षांमध्ये तेढ निर्माण केली आहे. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आहे. आणि मुर्मू यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणारा JMM आदिवासींच्या नावावर राजकारण करत आहे. अशा स्थितीत झारखंडचे राज्यपाल मुर्मू यांच्या विरोधात जाऊन यशवंत सिन्हा यांना मत देणे त्यांना अवघड झाले आहे.

अन् नितीशकुमार यांनी महाआघाडी सोडली

2017 मध्ये आरजेडीसोबत सरकार चालवत असलेल्या नितीश कुमार यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार राम नाथ कोविंद यांना पाठिंबा देत बिहारचे राज्यपाल सर्वोच्च घटनात्मक पदावर जातील असे म्हटले होते. काही काळानंतर नितीशकुमार यांनी महाआघाडी सोडली आणि भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT