उत्तराखंडमध्ये पावसाचा (Rain) कहर  Dainik Gomantak
देश

केरळनंतर आता उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर

गौरीकुंड-केदारनाथ वॉकवर मंदाकिनी नदीच्या दुसऱ्या बाजूने जखमी प्रवाशांसह अनेकांची सुटका करण्यात आली. रात्रभर सर्वत्र सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा (Rain) सामना केल्यानंतर एसडीआरएफने 22 प्रवाशांची सुटका केली.

दैनिक गोमन्तक

केरळ (Kerala) बरोबरच आता उत्तराखंडच्या (Uttarakhand) अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील प्रशासन सतर्क आहे. चार धाम यात्रा बंद करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर खबरदारी म्हणून शाळा आणि महाविद्यालये देखील बंद करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) मुख्यमंत्र्यांशी पाऊस (Rain) व पूरस्थितीवर चर्चा केली. येथे येणाऱ्या पर्यटकांना घरीचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अनावश्यक प्रवास टाळण्याचे देखील सांगण्यात आले आहे. पर्वतांमध्ये पाऊस पडल्यानंतर अनेक नद्यांना उधाण आले आहे. मंदाकिनी नदीचा प्रवाह खूप वेगवान झाला आहे. सोमवारी, राज्य सरकारने आपत्कालीन बैठक घेतली जेणेकरून कोणतीही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली जाऊ शकेल. उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी सतत पावसामुळे समस्या वाढत आहे.

केदारनाथ मंदिरात अडकलेल्या 22 प्रवाशांची सुटका

अनेक ठिकाणी प्रवासी अडकल्याच्या बातम्याही येत आहेत. एसडीआरएफ, उत्तराखंड पोलिसांनी रात्री उशिरा जानकी चट्टी येथून प्रवाशांना गौरीकुंडला सुरक्षितपणे नेले. हे प्रवासी केदारनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर तेथेच अडकले होते. पावसामुळे भूस्खलन आणि मलबा पडण्याचा धोका होता. गौरीकुंड-केदारनाथ वॉकवर मंदाकिनी नदीच्या दुसऱ्या बाजूने जखमी प्रवाशांसह अनेकांची सुटका करण्यात आली. रात्रभर सर्वत्र सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा सामना केल्यानंतर एसडीआरएफने 22 प्रवाशांची सुटका केली.

नैनीतालच्या मॉल रोडवर पाणीच पाणी

उत्तराखंडचे प्रसिद्ध पर्यटनस्थळ नैनीतालमध्ये आजपर्यंत लोकांनी पाहिले नाही असे दृश्य आहे. 24 तास सतत पाऊस पडत आहे, यामुळे नैनी तलावाचे पाणी इतके वाढले आहे की पाणी मॉल रोड पर्यंत आले आहे. सध्या पाणी कमी झाले असले तरी रस्ते बंदच आहेत. रात्री येथे लोक मॉल रोड वरून घोट्यापर्यंतच्या पाण्यात जाताना दिसत होते. नैनी तलावाचे एक्झिट गेट उघडल्यानंतर नाल्याच्या आजूबाजूला बांधलेल्या घरात राहणारे लोक तणावाखाली होते. नैनीतालचा हळदवानी आणि भोवलीशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे वीज गेली असून, कचरा रस्त्यावर पोहोचला आहे. त्यामुळे रस्ते बंद करण्यात आले आहेत. नैनीताल, रानीखेत, अल्मोडा ते हल्द्वानी आणि काठगोदाम पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आले आहेत. ऋषिकेशमधील चंद्रभागा पूल, तपोवन, लक्ष्मण झुला आणि मुनी-की-रेती भद्रकाली येथे प्रवासी वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे. हल्द्वानीतील गौला नदीवरील पुलावर उपस्थित स्थानिकांनी पाण्याची पातळी वाढल्याने वाहून जाणारा पूल ओलांडून त्यांच्या बाजूने येणाऱ्या मोटरसायकलस्वारांना सतर्क करण्यासाठी ओरडले. मोटारसायकलस्वार मागे वळला आणि स्वतःच्या बाजूला परतला

नैनीतालच्या रामगढमध्ये ढग फुटल्याची बातमी

नैनीतालच्या रामगढमध्ये ढग फुटल्याची बातमी आहे. रामगढच्या टोकना गावात ढगफुटी झाल्याचे समोर येत आहे. ढिगाऱ्याखाली 9 जण दबल्याची देखील माहिती समोर येत आहे. पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

चमोली-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद

उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्येही संततधार पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. येथील चमोली-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गाच्या लांबागड नाल्यात एक कार अडकली. यानंतर 'सीमा रोड ऑर्गनायझेशन'च्या जेसीबीच्या मदतीने मोठ्या अडचणीने कार बाहेर काढण्यात आली. कारमधील सर्वजण सुरक्षित आहेत. यापूर्वी नाल्यातील पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे मदतकार्याला अडचणी येत होत्या, पण अखेर ती बाहेर काढण्यात अखेर ती बाहेर काढण्यात यथ आले. सध्या या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT