मागील बऱ्याच दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस पडतोय(Kerala Heavy Rain). या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. केरळमध्ये पावसाने मोठी नासधूस केली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे.त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि भूस्खलनामुळे (Kerala Landslide) राज्यात आतापर्यंत एकूण 26 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोक बेपत्ता आहेत. कोट्टायममध्ये पावसाचा जास्तीत जास्त परिणाम दिसून येत आहे. कोट्टायममध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, अल्लाप्पुझा जिल्ह्यात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, पावसामुळे, पठाणमथिट्टा आणि इडुक्की या भागांमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे.(Kerala Heavy Rain: 26 people dies in Kerala rain & Kerala landslide)
या मुसळधार पावसामुळे निसर्गाच्या प्रकोपाला सामोरे जाणाऱ्या केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य मोठया प्रमाणावर सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय लोकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या 11 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायम जिल्ह्याच्या आसपासच्या भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.तर दुसरीकडे कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहने वाहून गेली. नदीच्या काठावरही मोठ्या प्रमाणात झाडे पडली आहेत.
पावसाच्या या मोठ्या संकटा दरम्यान दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे., "केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जखमी आणि बाधित लोकांना मदत करण्यासाठी काम केले जात आहे. मी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो."अशा आशयाचं ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
त्याचबरोबर पंतप्रधानांनी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीव गमावलेल्यांसाठी दु: ख व्यक्त केले आहे , "केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जीवितहानी झाल्याचे पाहून दुःख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना." ही त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात सतत चालू असलेल्या या पावसामुळे हवामान विभागाने केरळ, तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, कोट्टायम, अल्लाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड या 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासामुळे येल्लो अलर्ट जारी केला आहे.
हे सगळं असतानाच केरळमध्ये पावसाचा इतका जोरात फटका बसला आहे की अनेक घरे अगदी पात्यांसारखी कोसळत आहेत. मुसळधार पावसामुळे कोट्टायमच्या मुंडकायममध्ये काल एका नदीच्या जोरदार पाण्याच्या प्रवाहाने एक अक्खे घरच वाहून गेले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.